सानिया मिर्झा पुन्हा लग्न करणार, तर शोएब आणि सनाच्या वैवाहिक आयुष्याबाबत ज्योतिषाने केली भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:50 AM2024-03-19T10:50:40+5:302024-03-19T10:50:57+5:30
सानिया मिर्झा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच सानियानं तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिककडून घटस्फोट घेतला. यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबतही लग्न केलं आहे. ज्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. आता सानिया दुसऱ्यांदा लग्न करणार की नाही याबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे.
प्रसिद्ध ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी 2022 मध्ये Koimoiला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी सानिया-शोएबबाबत मोठी भविष्यवाणी केली होती. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं लग्न मोडणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. सानिया-शोएबचे लग्न तुटण्याचं कारण ही तिसरी व्यक्ती असेल, असे ते म्हणाले होते. तर आता 2024 मध्ये नेमकं तेच घडलं. सना जावेदच्या प्रेमात पडल्यानंतर शोएबने सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतला. अर्थात सोशल मीडिया युजर्सच्या मते ज्योतिषी पंडित जगन्नाथ यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
ज्योतिषी पंडित जगन्नाथ यांनी पुन्हा एकदा सानिया मिर्झा आणि शोएब मलिकबाबत भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले, 'सानियाचा सूर्य आणि शनि उज्वल भविष्याकडे बोट दाखवत आहेत. सानियाला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्रास होईल आणि तिच्या मानसिक स्थितीवरही विपरीत परिणाम होईल. पण सूर्य आणि शनिमुळे सानिया सर्व आव्हानांवर मात करून आत्मसंयम मिळवेल'. ते म्हणाले की, 'सानिया पुन्हा लग्न करू शकते'. पंडितजींचा दावा आहे की, 'येत्या 2-3 वर्षात तिचं पुन्हा लग्न होण्याची शक्यता आहे. पण ती इतका मोठा निर्णय ती काळजीपूर्वक घेईल'.
सानिया मिर्झा व्यतिरिक्त पंडित जग्गानाथ गुरुजी यांनी शोएबच्या वैवाहिक जीवनात काय घडणार आहे, याचा अंदाज वर्तवला. तो म्हणाला की, 'शोएब मलिक आणि सना जावेदच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. या दोघांच्या कुंडलीत मंगळ असल्यामुळे दोघेही अतिविचार करणार असल्याचे संकेत आहेत आणि पुढील ३-५ वर्षे नात्यात अडचणी येऊ शकतात'. तसेच नवविवाहित जोडप्यांना सूचना देताना ते म्हणाले, 'दोघांनी परस्पर समज सुधारली पाहिजे. त्यांनी समस्यांबाबत सावध असलं पाहिजे. कारण यामुळे त्यांच्या नातेसंबंधाला धोका निर्माण होतो'.