सानिया मिर्झाची 'परी'साठी खास पोस्ट, बेस्टफ्रेंडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहचली उदयपूरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 14:27 IST2023-09-24T14:20:36+5:302023-09-24T14:27:35+5:30

बेस्ट फ्रेंड परिणीती चोप्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सानिया मिर्झा उदयपूरला पोहोचली आहे. सानियासोबत तिची धाकटी बहीण अनम मिर्झा देखील विमानतळावर स्पॉट झाली.

Sania Mirza spotted at Airport in Udaipur for Parineeti Chopra-Raghav Chadh marriage | सानिया मिर्झाची 'परी'साठी खास पोस्ट, बेस्टफ्रेंडच्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहचली उदयपूरला

Sania Mirza - Parineeti Chopra

अभिनेत्री परिणीती चोप्रा आज मीस टू मिसेस होणार आहे. परिणीती आणि आप नेते राघव चढ्ढा आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांचा उदयपूरमध्ये शाही लग्न सोहळा होतोय. बेस्ट फ्रेंड परिणीती चोप्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सानिया मिर्झा उदयपूरला पोहोचली आहे. सानियासोबत तिची धाकटी बहीण अनम मिर्झा देखील विमानतळावर स्पॉट झाली.

शिवाय, सानियाने एक खास पोस्ट केली होती. यात तीने परिणीतीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला. सानियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या गोड मुलीचे अभिनंदन. तुला एक छान मिठी देण्याची आता माझी पाळी आहे'. परिणीती आणि सानिया या चांगल्या मैत्रिणी आहेत. २०१९ मध्ये हे दोघीही नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये दिसल्या होत्या. दोघीही एकमेकींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नसल्या तरी त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.

परिणीती-राघवच्या शाही लग्नात चोख बंदोबस्त  करण्यात आला आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ लीक होऊ नयेत यासाठीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, पाहुण्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यावर निळी टेप चिकटवली जात असल्याची माहिती आहे. 

राघवच्या शाही लग्नसोहळ्याच्या विधींवर नजर टाकली, तर दुपारी ३.३० वाजता दोघांच्या वरमाला होतील. तर चार वाजता दोघेही सात फेरे घेतील आणि संध्याकाळी 6.30 वाजता परिणीतीची पाठवणी होईल. तर आजच रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान लीला पॅलेसमध्ये नवीन जोडप्याचं रिसेप्शन पार पडेल.

Web Title: Sania Mirza spotted at Airport in Udaipur for Parineeti Chopra-Raghav Chadh marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.