'शाहरुख आणि अक्षय जर...', सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 17:08 IST2024-06-09T17:05:30+5:302024-06-09T17:08:30+5:30
सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसपटू आहे.

'शाहरुख आणि अक्षय जर...', सानिया मिर्झा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज ?
सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसपटू आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. खेळाबरोबरच सानियाच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. सौंदर्याने भुरळ पाडणारी सानिया सध्या चर्चेत आली आहे. नुकतेच सानिया 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाली. यावेळी सानियाने एकदम हशामस्करी करत शोमध्ये आनंद लुटला. या शोमध्ये सानियाने तिच्या बायोपिकवर भाष्य केलंय.
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सानिया मिर्झासह बॉक्सर मेरी कॉम, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि शार्पशूटर सिफ्त कौर ही मंडळी सहभागी झाल्या होत्या. यावेळी बॉक्सर मेरी कॉम, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या दोघींचे बायोपिक झाले असल्याचं कपिलनं म्हटलं. 'मेरी कॉम'च्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) काम केलं आहे. परिणीती चोप्राने सायना नेहवालच्या भूमिका साकारली. तर तुझ्या बायोपिकमध्ये तुला कोणाला पाहायला आवडेल?' असा प्रश्न कपिलने सानियाला केला.
कपिलला उत्तर देत सानिया मिर्झा म्हणाली की, 'आपल्या देशात अनेक चांगले कलाकार आहेत. कोणीही काम केलं तरी चालेल. किंवा मी स्वत:देखील अभिनय करू शकते'. कपिल शर्माने पुढे सानियाला विचारलं की, 'तुझ्या बायोपिकमध्ये शाहरुख काम करत असेल तर त्याच्या अपोझिट अभिनय करायला तुला आवडेल का?'. या प्रश्नाचं उत्तर देत सानिया मिर्झा म्हणाली की, 'शाहरुख खान (Shah Rukh Khan) जर चित्रपटात काम करत असेल तर मला त्याच्यासोबत अभिनय करायला आवडेल. जर अक्षय कुमार (Akshay Kumar) चित्रपटात झळकणार असेल तर नक्की काम करेल'.
काही दिवसांपुर्वी सानिया तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. शोएब मलिकने सानियापासून विभक्त होऊन अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. तेव्हा अनेक चाहत्यांना धक्का बसला. सानिया आणि शोएब यांचे लग्न एप्रिल 2010 मध्ये झाले होते. शोएबने आपली पहिली पत्नी आयशा सिद्धीकी हिला तलाक देऊन सानिया बरोबर दुसरे लग्न केले होते. या दोघांचा संसार सुमारे बारा वर्षांचा होता. घटस्फोटानंतर सानिया कोणत्याचा इव्हेंटमध्ये सहभागी झाली नव्हती. आता 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' सानिया पहिल्यांदाच मनमोकळं करताना दिसली आहे.