संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:40 PM2021-03-09T14:40:21+5:302021-03-09T15:44:12+5:30

संजय लीला भन्साळी सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

Sanja leela bhansali tested corona positive gangubai kathiawadi shooting stopped | संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण होताच आलिया भटने तातडीने उचलले 'हे' महत्त्वाचे पाऊल

googlenewsNext

अभिनेता रणबीर कपूरनंतर आता सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक संजय संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार संजय लीला  भन्साळी सध्या  'गंगूबाई काठियावाडी'च्या शूटिंगमध्ये बिझी होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे सिनेमाचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. संजय लीला भन्साळी यांनी स्वत:ला होम क्वारांटाईन केले आहे. आलियाने स्वत:ला होम क्वारांटाईन केलं आहे. 

सिनेमाचा टीझर रिलीज तीन दिवसांनी अभिनेता अजय देवगणने ही मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. आलिया भट यात गंगूबाईची पहिल्यांदाच यात एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आलिया भट व्यतिरिक्त यात विजय राज, हुमा कुरेशी, शंतनु माहेश्वरी आणि सीमा पहावा दिसणार आहेत. हा सिनेमा 30 जुलै 2021 ला रिलीज होणार आहे.

कोण होती गंगूबाई काठियावाडी?
 माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातच्या काठियावाडमध्ये राहणारी होती. त्यामुळे तिला काठियावाडी म्हटले जात असे. लहान वयात गंगूबाईला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. कुख्यात गुन्हेगार गंगूबाईकडे येत. मुंबईच्या कमाठीपुरा भागात गंगूबाई ‘कोठा’ चालवायची. या गंगूबाईने सेक्सवर्करच्या मुलांसाठी प्रचंड मोठे काम केले.

Web Title: Sanja leela bhansali tested corona positive gangubai kathiawadi shooting stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.