संजय दत्तपेक्षा किती वर्षांनी लहान आहे मान्यता? काय आहे तिचं खरं मुस्लिम नाव? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:39 IST2025-02-11T13:30:13+5:302025-02-11T13:39:31+5:30
संजय दत्तनं वयाच्या ५० व्या वर्षी मान्यतासोबत लग्नगाठ बांधली होती.

संजय दत्तपेक्षा किती वर्षांनी लहान आहे मान्यता? काय आहे तिचं खरं मुस्लिम नाव? जाणून घ्या...
Sanjay Dutt And Maanayata: अभिनेता संजय दत्त नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडनंतरसंजय दत्त आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे. संजयनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने मिळवलेल्या या यशात सगळ्यात मोठा वाटा आहे, तो त्याची पत्नी मान्यता दत्त हिचा. मान्यता ही प्रत्येक परिस्थितीत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिने कधीही अभिनेत्याची साथ सोडली. संजू बाबा आणि मान्यता हे बी-टाउनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे जोडपे आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. आज दोघांच्या लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाले आहेत.
संजय दत्तच्या एक दोन नाही तर तर तब्बल ३०८ गर्लफ्रेंड होत्या. हे संजय दत्तचा बायोपिक चित्रपट संजूमधून समोर आलं होतं. बॉलिवूडमध्येही त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेलं होतं. मान्यता हिच्यासोबत लग्न करण्याआधी संजयचे दोन लग्न झाले होते. पण शेवटी त्याने अभिनेत्री मॉडेल मान्यता दत्तसोबत संसार थाटला. याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. मान्यता ही संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान आहे. ती मुस्लिम कुटुंबातील असून तिचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून मान्यता ठेवल्याचं बोललं जातं.
संजय आणि मान्यता यांची पहिली भेट २००६ मध्ये झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर त्यांनी ११ फेब्रुवारी २००८ मध्ये लग्न केले. दोघांनी लग्न केलं, तेव्हा मान्यता २९ वर्षांची तर संजय ५० वर्षांचा होता. लग्नानंतर दोन वर्षांनी मान्यता आणि संजय जुळ्या मुलांचे आई – वडील झाले. मान्यता हिने एक मुलगा आणि मुलीला जन्म दिला. मुलाचे नाव शरण आणि मुलीचे नाव इक्रा असे आहे. संजय पत्नी मान्यता आणि मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगतोय.