शाहरुख खान, प्रितीनंतर आता संजय दत्तही झाला 'या' क्रिकेट टीमचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:56 AM2023-06-23T09:56:54+5:302023-06-23T09:58:06+5:30
अनेक बॉलिवूड स्टार्सने क्रिकेट टीम खरेदी केली आहे. त्यात आता संजय दत्तचाही समावेश झालाय.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) क्रिकेटच्या मैदानात एंट्री घेतली आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सने क्रिकेट टीम खरेदी केली आहे. त्यात आता संजय दत्तचाही समावेश झालाय. झिम्बाब्वे 'जिम एफ्रो टी10' (Zim Afro T10) टूर्नामेंटची तयारी करत आहे. या टूर्नामेंटची सुरुवात 20 जुलैपासून होत आहे. दरम्यान संजय दत्तने एरिज ग्रुप ऑफ कंपनीजचे सोहन रॉयसोबत मिळून त्याने हरारे हरिकेन्स टीम खरेदी केली आहे.
5 टीम्सचा सहभाग
झिम्बाब्वे द्वारा आयोजित या टूर्नामेंटमध्ये एकूण 5 टीमने सहभाग घेतला आहे. डरबन कलंदर्स, केपटाऊन सैम्प आर्मी, बुलावायो ब्रेव्स, जोगर्ब लायंस आणि हरारे हरिकेन्स या टीम्सचा समावेश आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर कलंदर्सने डरबन कलंदर्सची टीम खरेदी केली आहे.
'जिम एफ्रो टी10' टूर्नामेंटची सुरुवात २० जुलैपासून होईल. २ जुलैपासून खेळाडूंना नाव नोंदवता येणार आहे. जिम एफ्रो टुर्नामेंटचा हा पहिला सीजन असणार आहे. संजय दत्तने टीम खरेदी केल्यानंतर उत्सुक असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच हरारे हरिकेन्स टुर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करेल आणि झिम्बाब्वेमध्ये क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
संजय दत्त म्हणाला, 'भारतात क्रिकेटला धर्माएवढं महत्व आहे आणि सर्वात लोकप्रिय खेळ आहे. खेळाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. या खेळात क्षेत्रात झिम्बाब्वेचं प्रदर्शन चांगलं आहे. यासोबत जोडला गेल्याने मी खूश आहे. हरारे हरिकेन्सच्या टूर्नामेंटमध्ये चांगलं प्रदर्शन करेल यासाठी मी उत्सुक आहे.'
29 जुलैला होणार अंतिम सामना
ही लीग ९ दिवस चालणार असून २० जुलै रोजी अंतिम सामना खेळण्यात येईल. झिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक गिवकोप मकोनी म्हणाले, 'झिम्बाब्वेमधील खेळाच्या इतिहासात हा सर्वात मोठा क्षण आहे. मला या लीगसोबत जोडला गेल्याने अभिमान वाटत आहे. आम्ही जगभरातील सर्व क्रिकेटरसिकांचं मनोरंजन करु.