मान्यता अन् संजय दत्तने साजरा केला लग्नाचा दहावा वाढदिवस, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 10:22 AM2018-02-08T10:22:37+5:302018-02-08T15:53:35+5:30

अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्तने नुकताच त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला. याबाबतचा एक फोटो मान्यताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.

Sanjay Dutt celebrates 10th wedding anniversary, see photo! | मान्यता अन् संजय दत्तने साजरा केला लग्नाचा दहावा वाढदिवस, पाहा फोटो!

मान्यता अन् संजय दत्तने साजरा केला लग्नाचा दहावा वाढदिवस, पाहा फोटो!

googlenewsNext
िनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त बॉलिवूडमधील सर्वात बेस्ट कपल्सपैकी एक आहे. नुकताच दोघांनी त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी दोघांच्याही चेहºयांवरील आनंद बघण्यासारखा होता. यावेळी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचा एक फोटो मान्यताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. 

दरम्यान, संजूबाबाने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत परिवारातील काही सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होती. पार्टीतील एक फोटो मान्यताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामध्ये पती संजय दत्तसह परिवारातील काही सदस्य आणि मित्रमंडळीसोबत बघावयास मिळत आहे. मान्यताने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, ‘माय फॅमिली... हाफ टेम्पर हाम मेन्टल... आजच्या रात्री मला खूप आनंद होत आहे. आमच्या संसाराला दहा वर्ष पूर्ण झाले. या सुंदर रात्रीसाठी आभार.’
 

मान्यता आणि संजय दत्तने ७ फेब्रुवारी २००८ मध्ये लग्न केले. मान्यता संजय दत्तपेक्षा २० वर्षानी लहान आहे. मान्यता आणि संजय दत्त यांची दोन मुले आहेत. शहरान दत्त आणि इकरा दत्त अशी त्यांची नावे आहेत. संजूबाबाप्रमाणे मान्यताही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. मात्र लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. सध्या मान्यता संजय दत्तच्या फिल्म प्रॉडक्शन हाउसची सीइओ आहे. जेव्हा संजूबाबा कारागृहात होता, तेव्हा त्याचे सर्व कामकाज मान्यताच सांभाळत होती. मान्यताने त्यावेळी अतिशय धाडसाने सर्व जबाबदाºया स्वीकारल्या होत्या. 

Web Title: Sanjay Dutt celebrates 10th wedding anniversary, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.