​संजय दत्त उपभोगतोयं ‘स्वातंत्र्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 20:25 IST2016-03-26T03:25:39+5:302016-03-25T20:25:39+5:30

तुरुंगातून  बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त आताश: स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद घेतोय. फेबु्रवारी महिन्यात पुण्याच्या येरवडा तुरुंगातून संजय सुटला. तेव्हापासूनचा ...

Sanjay Dutt Consumers 'freedom' | ​संजय दत्त उपभोगतोयं ‘स्वातंत्र्य’

​संजय दत्त उपभोगतोयं ‘स्वातंत्र्य’

रुंगातून  बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त आताश: स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद घेतोय. फेबु्रवारी महिन्यात पुण्याच्या येरवडा तुरुंगातून संजय सुटला. तेव्हापासूनचा सगळा वेळ संजय कुटुंबासोबत घालवतोयं.अलीकडे संजयने पत्नी मान्यतासोबत एका वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर संजूबाबा बाहेर पडला. पण का कुणास ठाऊक, अलीशान एसी गाडीतून घरी जाण्याऐवजी संजूबाबा चक्क आॅटोरिक्षाने घरी गेला. अनेकांना संतूबाबाचा हा मूड पाहून आश्चर्य वाटले. पण खुद्द संजूबाबाला विचाराल तर तो त्याने ही आॅटो राईड मस्तपैकी एन्जॉय केली. शिवाय नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचाही मनमुराद आनंद लुटला...व्वा मुन्नाभाई...मान गयें...

Web Title: Sanjay Dutt Consumers 'freedom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.