जेव्हा येते तुझी आठवण...! प्रियकराच्या आठवणीने संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 03:35 PM2020-12-13T15:35:50+5:302020-12-13T15:38:35+5:30
मी अजूनही सावरण्याचा प्रयत्न करतेय...
गतवर्षी 2 जुलैला संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. बॉयफ्रेन्डच्या अनपेक्षित मृत्यूने त्रिशाला कमालीची खचली होती. अद्यापही ती यातून सावरू शकलेली नाही. गत २ जुलैला त्रिशालाच्या इटालियन बॉयफ्रेन्डचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर त्रिशालाला स्वत:ला सावरणे कठीण जातेय. सोशल मीडियावर प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये एका युजरने त्रिशालाला बॉयफ्रेन्डच्या मृत्यूबद्दल छेडले आणि त्रिशाला पुन्हा भावूक झाली.
‘मी अजूनही त्या दु:खाशी लढतेय. यातून सावरण्यासाठी मी अनेकांची मदत घेतली, आजही घेतेय. मी थेरपीची मदत घेतेय. माझ्या थेरपिस्टला ऑनलाईन भेटते. कोरोना काळात कुटुंब व मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करतेय. त्याच्या निधनानंतर मी बराच काळ सोशल मीडियापासून दूर राहिले. जे काही घडले, त्यातून बाहेर येण्यासाठी मला वेळ हवा होता. तो गेला आणि माझे अख्खे आयुष्य बदलले. मी काय गमावले, हे जाणून घेण्याची गरज होती. माझ्या थेरपिस्टने मला खूप मदत केली. आताश: माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवू लागली आहे. त्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी मला जवळपास 1 वर्षे लागले. अद्यापही भावनांवर नियंत्रण मिळवण्याचे माझे प्रयत्न सुरूच आहेत, ’ असे तिने एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
बॉयफ्रेन्डच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्रिशालाने एक भावूक पोस्ट लिहिली होती.
तिने लिहिले होते,‘माझ्या पायाखालची जमिन सरकली होती, त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. आता माझे आयुष्य पूर्णत: बदलले आहे. गेल्या वर्षभरापासून मी जवळजवळ सोशल मीडियापासून दूर होते. आठ वर्षांच्या वयात आईला गमावणे आणि त्यानंतर दोन दशकांपेक्षाही अधिक काळ त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणे. निश्चितपणे त्या सुंदर आत्म्याला मला गमवायचे नव्हते. ही केवळ काळासोबत बदलण्यासारखी गोष्ट नाही. आयुष्यातील या दु:खद क्षणांचा सामना तुम्हाला करावा लागतो. भावनांचा रोलरकोस्टर झेलावा लागतो. गेल्या वर्षभरात मी खूप रडले आणि नंतर या अश्रूंपासून दूर पळून जाण्याचेही प्रयत्न केलेत. तू या जगातून गेल्यानंतर मला नोकरी सोडावी लागली. कारण माझीच स्थिती चांगली नसताना मी कुणाच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घेणार? अनेकदा लोकांपुढे माझा धीर खचला. मला मदत हवी का, असे लोकांनी मला विचारले. वर्षभरात मी प्रत्येक गोष्ट खाल्ली, माझे वजन 13 किलो वाढले. असो, ठीक आहे. असे काहीही नाही जे मी ठीक करू शकणार नाही. त्याच्या अनेक आठवणी माज्याजवळ आहेत. त्याचे टेक्स्ट मैसेज, नोट्स, त्याचा टूथब्रश, त्याची आवडती गाणी, त्याचे टी-शर्ट. तो खूप सुंदर व्यक्ति होता. मला तो सतत हसवायचा. मदतीसाठी तत्पर असणारा, चांगला श्रोता होता. त्याला माझ्यावर विश्वास होता. माझी तो प्रचंड काळजी घ्यायचा. माझा आदर करायचा. त्याने कधीच मला जज केले नाही. त्याच्या कुटुंबानेही माझे स्वागत केले. त्याच्या आयुष्याचा भाग बनणे आनंदाची गोष्ट होती. तो कायम माझ्या आयुष्याचा भाग राहिल आणि माझ्या कहाणीचाही. मी त्याच्याशिवाय अपूर्ण आहे पण तो काही क्षणांसाठी माज्यासोबत होता, यासाठी मी जगातील सर्वात नशीबबानही आहे.’
त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. 2014 मध्ये तिने पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेन्शन लाइन सुरू केली होती. न्युयॉर्कमधील जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमध्ये तिने कायद्याची पदवी घेतलीय.
1987 मध्ये संजय दत्तने ऋचा शर्मासोबत लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म 1988 मध्ये झाला. ऋचा ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याने 10 डिसेंबर 1996 मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्त नेहमी तिच्या संपर्कात असून, दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री आहे. याशिवाय संजय दत्तची पत्नी मान्यतासोबतही तिचे चांगले संबंध आहेत.
संजय दत्तची सायकोथेरपिस्ट मुलगी त्रिशालाने दिलं वडिलांच्या ड्रग्स अॅडिक्शनवर उत्तर....