"माझा चित्रपट पाहू नका" असं का म्हणाला होता संजय दत्त, तुम्ही पाहिलात 'तो' ब्लॉकबस्टर सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:36 IST2025-01-03T12:35:21+5:302025-01-03T12:36:02+5:30
संजय दत्त याचा असा एक सिनेमा आहे, जो चित्रपट पाहू नका असं त्यानं प्रेक्षकांना म्हटलं होतं.

"माझा चित्रपट पाहू नका" असं का म्हणाला होता संजय दत्त, तुम्ही पाहिलात 'तो' ब्लॉकबस्टर सिनेमा?
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे गाजलेले चित्रपट दिले आहेत. अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. चित्रपट बनवल्यानंतर त्याच्या प्रमोशनसाठी संजय दत्त खूप मेहनत घेतो, जेणेकरून प्रेक्षकांना तो सिनेमा पाहता येईल. पण फार कमी लोकांना माहिती असेल की, संजय दत्त याचा असा एक सिनेमा आहे, जो चित्रपट पाहू नका असं त्यानं प्रेक्षकांना म्हटलं होतं. तर तो कोणता चित्रपट होता, हे जाणून घेऊया.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी संजय दत्तने प्रेक्षकांना आपला चित्रपट पाहू नका, असं सांगितलं होतं. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे. तो चित्रपट आहे 'जंग' (Jung). संजय दत्तसोबतच सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीही सिनेमा पाहू नका असं सांगितलं होतं. सिनेमा पुर्ण शूट झाला नव्हता. तरीही तो प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे तो चित्रपट पाहू नका असं सिनेमाच्या संपुर्ण टीमने लोकांना म्हटलं होतं. पण, अगदी उलट घडलं होतं. प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकांना तो चित्रपट पाहण्यास का मनाई केली होती, याचा खुलासा केला. संजय गुप्ता यांनी सांगितलं की, "सिनेमात निर्मात्याच्या ढवळाढवळीमुळे शूटिंग पूर्ण करण्यात खूप त्रास झाला होता. सतीश टंडन हे 'जंग'चे निर्माते होते. त्यांनी आयुष्यात फक्त एकच पिक्चर बनवला होता. सिनेमाची गाणी ही साऊथ आफ्रिकेत शूट करायची होती. पण, त्यांनी नकार दिला. ही गाणे फिल्मसिटी, लिंकिंग रोडवरच शूट करण्यास सांगितलं"
संजय गुप्ता यांनी पुढे सांगितलं, "जेव्हा मी त्यांना म्हटलं की ठिक आहे, गाण्याचं शूटिंगच आपण नंतर पाहू. पण, आधी सिनेमाचं पुर्ण शूट करून टाकू. पण, त्यांनी सिनेमा पाहिला. आता आणखी शूटची गरज नाही आणि सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यावर आम्ही खूप नाराज झालो आणि संजय दत्तच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेत चित्रपट पाहण्यास मनाई केली".