एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर; सेटवर दाखवली नाही ओळख?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:03 PM2023-09-04T13:03:25+5:302023-09-04T13:04:00+5:30
Dilip prabhavalkar: 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमात दिलीप प्रभावळकर आणि संजय दत्तने एकत्र काम केलं होतं.
मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर. कधी नायक, कधी खलनायक तर कधी स्त्री भूमिका साकारुन या अभिनेत्याने प्रत्येक वेळी प्रेक्षकांना अचंबित केलं. मराठीसह बॉलिवूडमध्येही त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे लगे रहो मुन्नाभाई. या सिनेमा त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. मात्र, एकाच सिनेमात दोघांनीही काम करुन संजयने एकदा दिलीप प्रभावळकर यांना ओळखलं नव्हतं.
'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. एकदा या सिनेमच्या सेटवर दिलीप प्रभावळकर विना गेटअप बसले होते. त्यामुळे संजय दत्तला ते ओळखताच येई ना. तो वारंवार त्यांच्याकडे पाहत होता. यांना कुठे तरी पाहिलंय असं त्याला सतत वाटत होतं. पण, तो नेमकं ओळखू शकत नव्हता. कारण, संजयने त्यांना कायम गांधीजींच्या गेटअपमध्ये पाहिलं होतं. विशेष म्हणजे दिलीप यांचं खूप निरीक्षण केल्यानंतर संजयने त्यांना ओळखलं. हा किस्सा दिलीप प्रभावळकर यांनीच शेअर केला होता.
दरम्यान, दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांच्या चिमणराव, 'चौकट राजा'मधील नंदू, 'झपाटलेला'मधील तात्या विंचू, 'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधील आबा या भूमिका विशेष गाजल्या आणि प्रेक्षकांच्याही स्मरणात राहिल्या.