‘मीटू’चे आरोप झेलणा-या राजकुमार हिराणींना ‘मुन्नाभाई’ची साथ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 10:30 AM2019-04-05T10:30:14+5:302019-04-05T10:32:23+5:30
संजू, पीके आणि मुन्नाभाई फ्रेंचाइजी सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव ‘मीटू’च्या वावटळीत सापडले आणि अनेकांना धक्का बसला. बॉलिवूडमधील अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. आता या यादीत त्यांचा जवळचा मित्र अभिनेता संजय दत्तचे नावही सामील झाले आहे.
संजू, पीके आणि मुन्नाभाई फ्रेंचाइजी सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव ‘मीटू’च्या वावटळीत सापडले आणि अनेकांना धक्का बसला. राजकुमार हिरानींनी आपल्यावरचे आरोप नाकारले. याशिवाय बॉलिवूडमधील अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. आता या यादीत त्यांचा जवळचा मित्र अभिनेता संजय दत्तचे नावही सामील झाले आहे.
होय, अलीकडे एका मुलाखतीत संजय दत्तने राजकुमार हिराणींना अगदी खुलेपणाने पाठींबा दिला. ‘ राज कुमार हिरानी यांच्यावरील आरोप मला अजिबात मान्य नाहीत. मी त्याच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे मी अनेक वर्षांपासून त्याला जवळून ओळखतो. त्या महिलेने असे आरोप का केलेत, हे मला ठाऊक नाहीत. पण कुणालाच हे आरोप पचनी पडलेले नाहीत. तुमच्यासोबत काही चुकीचे झाले असेल तर एफआयआर दाखल करा. पण राजू हिरानी यांच्यासारख्या व्यक्तीवरचे अशा आरोपांवर माझा अजिबात विश्वास नाही,’ असे संजयने यावेळी म्हटले.
हिरानी यांच्यासोबत सहदिग्दर्शिका म्हणून काम करणा-या एका महिलेने हिरानी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. पीडित महिलेने हिरानींच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.
हिरानी यांनी गत ६ महिन्यात (मार्च ते सप्टेंबर २०१८) अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याची व्यथा पीडित महिलेने मांडली होती. तथापिे या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला होता. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न आहे. हे सगळे प्रकरण कुठल्या लीगल बॉडीकडे वा कमेटीकडे नेण्याचा विचार मी केला असतानाच याप्रकरणात मीडियाची मदत घेतली गेली. पण हे आरोप मला मान्य नाहीत. या आरोपांचे मी खंडन करतो. हे सगळे आरोप एका कटाचा भाग आहेत आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत, असे हिरानींनी म्हटले होते.