By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2016 09:16 AM2016-09-21T09:16:56+5:302016-09-21T14:46:56+5:30
संजय दत्तला कारागृहातून सुटका होऊन बराचा कालावधी उलटला आहे. परंतु, त्याचा अजूनही कोणतचा चित्रपट सुरु झाला नाही. संजय दत्त ...
Next
/>संजय दत्तला कारागृहातून सुटका होऊन बराचा कालावधी उलटला आहे. परंतु, त्याचा अजूनही कोणतचा चित्रपट सुरु झाला नाही. संजय दत्त कारागृहातून बाहेर येण्याची काही निर्माते व दिग्दर्शकांना प्रतीक्षा होती. त्याला सोबत घेऊन चित्रपट तयार केली जाण्याची आशा होती. मात्र अजूनही त्याला चित्रपट मिळू शकला नाही. संजयचे चित्रपट इंडस्ट्रीजमध्ये काही मित्र आहेत. त्यामध्ये अजय देवगनचे सुद्धा नाव आहे.‘गोलमाल -४ ’ मध्ये संजय दत्तला घ्यावे. अशी अजयची इच्छा आहे. त्यामुळे त्याने दिग्दर्शक रोहित शेट्टीनाही सांगितले आहे. यामध्ये संजय असावा याकरिता रोहित शेट्टीही प्रयत्न करीत आहे. यामधम्ये अजय देवगन लीड रोल करीत आहे. त्यामुळे संजय दत्तलाही चांगलाच रोल मिळणार आहे. अजय व रोहित सोबत संजय दत्तने ‘ आॅल दी बेस्ट’ मध्ये काम केलेले आहे. 2009 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये संजयने महत्वाची भूमिका केली होती. गोलमाल -४ मध्ये संजय काम करण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे.