अन् आईच्या आठवणींनी भावूक झाला संजय दत्त, फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 15:35 IST2019-06-01T15:28:39+5:302019-06-01T15:35:50+5:30
ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडच्या सर्वात गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गीस दत्त या होत्या

अन् आईच्या आठवणींनी भावूक झाला संजय दत्त, फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज
ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडच्या सर्वात गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गीस दत्त या होत्या. नर्गिस यांचा जन्म 1 जून 1929 मध्ये झाला होता.1981 मध्ये कॅन्सरमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. संजय दत्तने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करुन जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
संजय दत्तने शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईटमधला आहे. यात नर्गिस आपल्या मुलांसोबत खेळताना दिसतायेत. लहानपणीच्या आईसोबतच्या आठवणी संजूबाबाच्या मनात आजही ताज्या असल्याच्या दिसतायेत. या फोटोला एक कॅप्शनसुद्धा त्यांने दिले आहे, ''आठवणी कधीच पुसट होत नाही. हॅपी बर्थडे आई.'' संजय दत्तच्या या फोटोवर फॅन्सनी काही तासातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
संजय दत्त आई नर्गिस यांच्या खूप क्लोज होता. एका मुलाखती दरम्यान संजय दत्तने सांगितले होते की, नर्गिस ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा त्यांनी संजय दत्तसाठी एक टेप रेकॉर्ड करुन पाठवली होती. त्यावेळी ती टेप ऐकून संजय रडला नाही. पण नंतर तीन वर्षांनी तीच टेप ऐकून तो जोरजोरात रडला.
संजय दत्तला या टेप त्याच्या वडिलांकडे मिळाल्या तेव्हा त्यात काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. त्याने ते टेप लावल्या तेव्हा घरात नर्गिस यांचा आवाज आला. त्यानंतर संजय दत्त पुढील 4 तास सतत रडत होता असे त्यांने सांगितले होते.