डब्बेवाल्यांच्या मदतीसाठी धावून आला संजूबाबा, वाचून तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:04 PM2020-06-10T16:04:10+5:302020-06-10T16:05:13+5:30

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

Sanjay Dutt has special message for Mumbai’s lifeline, the Dabbawalas | डब्बेवाल्यांच्या मदतीसाठी धावून आला संजूबाबा, वाचून तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक

डब्बेवाल्यांच्या मदतीसाठी धावून आला संजूबाबा, वाचून तुम्हाला वाटेल त्याचे कौतूक

googlenewsNext

 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. यादरम्यान या अडकलेल्या मजुरांसाठी देवासारखा धावून आला तो म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद. तो करत असलेल्या मदतकार्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. स्थलांतरितांची तो जी मदत करत आहे. त्यामुळे तो आता त्यांचा ‘रिअल हिरो’ बनलाय. त्याने अनेक मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. सोनू सूदच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आता आणखी एक अभिनेता लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी पुढे आला आहे. बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

कोरोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत डबेवाल्यांवर नामुष्की ओढवली. गेले तीन महिने त्यांचेही काम बंद आहे. त्यामुळे संजय दत्तने सोशल मीडियावरुन डब्बेवाल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टसोबत त्याने मुख्यमंत्री कार्यालय, आदित्य ठाकरे यांच्यापासून अनेकांना टॅग केले आहे.

संजय दत्तने ट्विट केले की, अनेक दशके मुंबईकरांच्या जेवणाची काळजी डब्बेवाल्यांनी घेतली. आता ते संकटात आहेत. त्यामुळे आता आपण पुढे येऊन मदत केली पाहिजे. 

कोरोना व्हायरसचा देशात प्रादुर्भाव सुरू झाला होता. त्यावेळी संजय दत्तने हजारो गरजू कुटुंबीयांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यावेळी संजय दत्त म्हणाला होता की, सगळा देश संकटाशी सामना करत असताना आपणही आपल्याला शक्य होईल ते केले पाहिजे. अशा वेळी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. मी फक्त माझ्याकडून जमतंय तेवढं करतो आहे.

Web Title: Sanjay Dutt has special message for Mumbai’s lifeline, the Dabbawalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.