कॅन्सरवरील उपचारासाठी संजूबाबा जाणार अमेरिकेला, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होणार दाखल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:49 PM2020-08-25T12:49:01+5:302020-08-25T13:47:02+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे कुटुंब कठीण काळातून जाते आहे.

Sanjay dutt to head to the us for lung cancer treatment at the same hospital where mother nargis was admitted | कॅन्सरवरील उपचारासाठी संजूबाबा जाणार अमेरिकेला, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होणार दाखल ?

कॅन्सरवरील उपचारासाठी संजूबाबा जाणार अमेरिकेला, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होणार दाखल ?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे कुटुंब कठीण काळातून जाते आहे. संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी  न्यूयॉर्कला जाण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार न्यूयॉर्कमधील त्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत, जेथे त्याची आई नर्गिसवर कॅन्सरचा उपचार झाले होते.

रिपोर्टनुसार, संजय दत्तला उपचारांसाठी अमेरिकेत 5 वर्षांता व्हिसा मिळू शकतो. अमेरिकेतील मेमोरियल स्लोआन कॅटरिंग कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहेत. संंजय दत्तची आई नर्गिस 1980 ते 1981 दरम्यान याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या. जेथे त्याच्यावर स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे उपचार झाले. रिपोर्टनुसार संजय दत्तला फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याने व्हिसासाठी अर्ज केला आहे.

मुंबई ब्लास्ट प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण झाली होती.  संजय दत्तला व्हिसा मिळवण्यासाठी त्याची जवळच्या मित्राने मदत केली आहे. संजय दत्तसोबत त्याची पत्नी मान्यता बहीण प्रियापण सोबत जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेने व्हिसा नकारला तर सिंगापूरमध्ये उपचारांसाठी जाण्याच्या तयारीत होता. मात्र आता सगळे ठीक झाल्यामुळ लवकरच न्यूयॉर्कला संजय दत्त रवाना होऊ शकतो. संजय दत्तचे फॅन्स त्याच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतायेत. 
 

Web Title: Sanjay dutt to head to the us for lung cancer treatment at the same hospital where mother nargis was admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.