संजय दत्तने उघडलं नवं रेस्टॉरंट, 'या' ठिकाणी मिळेल खवय्यांना मेजवानी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:31 IST2024-12-17T14:30:30+5:302024-12-17T14:31:41+5:30
संजय दत्तने हे नवीन रेस्टॉरंट दुबईत सुरु केले आहे.

संजय दत्तने उघडलं नवं रेस्टॉरंट, 'या' ठिकाणी मिळेल खवय्यांना मेजवानी!
Sanjay Dutt New Business : बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच स्वतंत्र व्यवसाय निर्मितीतही आपले नशीब आजमावत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे. अशा अनेक कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे लोकप्रिय अभिनेता संजय दत्तचं. अभिनेत्यानं नवीन रेस्टॉरंट (Restaurant ) उघडलं असून त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
संजय दत्तनं स्वत: नवीन रेस्टॉरंटबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या या रेस्टॉरंटचं नाव 'दत्त्स फ्रँकटी' (Dutts’franktea) असं आहे. संजय दत्तने हे नवीन रेस्टॉरंट दुबईत सुरु केले आहे. पत्नी मान्य दत्त हिच्यासोबत त्यानं हा नवा व्यववसाय सुरू केलाय. विशेष म्हणजे सलमान खान यानेदेखील आपल्या खास मित्राचं नवीन व्यवसायासाठी कौतुक केले. सलमानने इन्टावर स्टोरी शेअर करत लिहलं, "बाबासारखं कोणालाच नाही जमणार मग तो Role असो वा Rolls".
संजय दत्तच्या या नवीन रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. संजय दत्त लवकरच भारतातही त्याचे हे रेस्टॉरंट सुरू करणार असल्याची बातमी आहे. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकर 'बागी 4' चित्रपटात झळकणार आहे. येत्या ५ सप्टेंबर २०२५ मध्ये बागी-४ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येईल.