उपचारांसाठी कामातून ब्रेक घेत आहे, लवकरच परत येईन...! संजय दत्तच्या ट्विटने वाढवली चाहत्यांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 05:50 PM2020-08-11T17:50:20+5:302020-08-11T17:50:40+5:30
गेल्या शनिवारी श्वसनास त्रास जाणवू लागल्यानंतर संजयला मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते.
अभिनेता संजय दत्त सध्या आजारी आहे. गेल्या शनिवारी श्वसनास त्रास जाणवू लागल्यानंतर संजयला मुंबईच्या लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यामुळे संजूबाबाच्या चाहत्यांच्या चिंता वाढल्या होत्या. अर्थात दोन दिवसांच्या उपचारानंतर संजयला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे पाहून चाहते सुखावले होते. मात्र आता संजूबाबाच्या एका ट्विटने चाहते पुन्हा अस्वस्थ झाले आहेत. होय, उपचारांसाठी काही वेळासाठी कामातून ब्रेक घेत असल्याचे ट्विट संजयने केले आहे.
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 11, 2020
‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असे ट्विट संजय दत्तने केले आहे.
संजय दत्तने उपचारासाठी ब्रेक घेतला. पण कुठल्या आजारावरचे उपचार, याचा खुलासा त्याने केलेला नाही. यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तूर्तास संजय लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
Just wanted to assure everyone that I’m doing well. I’m currently under medical observation & my COVID-19 report is negative. With the help & care of the doctors, nurses & staff at Lilavati hospital, I should be home in a day or two. Thank you for your well wishes & blessings 🙏
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 8, 2020
संजय दत्तने शनिवारी रात्री ट्विट करत त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे दोन-तीन दिवसांत घरी परतणार असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये सांगितले होते. यानंतर संजयला कोरोना झाल्याची अफवा पसरली होती. संजयची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती.
तूर्तास संजय केजीएफ 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यात तो कन्नड सुपरस्टार यशसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.