मुलांना भेटून दुबईहून कॅन्सरवरील ट्रीटमेंटसाठी मुंबईत परतला संजय दत्त

By गीतांजली | Published: October 1, 2020 02:03 PM2020-10-01T14:03:45+5:302020-10-01T14:22:30+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त दुबईवरुन मुंबईत परतला आहे.

Sanjay dutt returns mumbai for third cycle of chemotherapy for lung cancer treatment | मुलांना भेटून दुबईहून कॅन्सरवरील ट्रीटमेंटसाठी मुंबईत परतला संजय दत्त

मुलांना भेटून दुबईहून कॅन्सरवरील ट्रीटमेंटसाठी मुंबईत परतला संजय दत्त

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त दुबईवरुन मुंबईत परतला आहे. दुबईत संजय दत्तने मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करुन परतला आहे. आपल्या  फुफ्फुसांच्या कर्करोगवरील उपचारा दरम्यान संंजय दत्त दुबईला गेला होता. मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. जवळपास 10 ते 12 दिवस संजय दत्त मुलांसोबत दुबईत होता. संजूबाबा मुलांची फार आठवण येत होती म्हणून शहरान आणि इकरा यांना भेटण्यासाठी तो दुबईला गेला होता. संजय दत्तच्या मुलांचे दुबईत ऑनलाईन क्लास सुरु आहेत. 

आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते की 30 सप्टेंबरपर्यंत संजय दत्त मुंबईत परतणार आहे. कारण त्याची तिसरी किमोथेरेपी सुरु होणार आहे. संजय दत्तची ट्रीटमेंट मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे.  

आधी अमेरिका किंवा सिंगापूरमध्ये जायचे होते संजय दत्तला
संजय दत्तचा किमोथेरपीसाठी आधी अमेरिकेत जाण्याचा प्लान होता मात्र असे होऊ शकले नाही. दुसरी पसंती सिंगापूरला होती मात्र तेही रद्द झाले. त्यामुळे सध्या संजय दत्त मुंबईतच कॅन्सरवर उपचार घेतो आहे.

कॅन्सरचे निदान होण्यापूर्वी संजयने अनेक सिनेमे साईन केले होते.कॅन्सवर उपचार घेत असताना संजय दत्तने याचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. उपचारांसोब संजय दत्तने आगामी सिनेमा शमशेराचे शूटिंग पूर्ण केले आहे. थोड्याशा पॅचवर्कसाठी त्याची गरज होती. याशिवा चित्रपटाशिवाय केजीएफ- चॅप्टर 2, पृथ्वीराज, भुज- द प्राईड ऑफ इंडिया, तोरबाज असे सिनेमे आहेत.

दुबईमध्ये कुटुंबासोबत असा वेळ घालवतोय संजय दत्त, पत्नी मान्यता दत्तच्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मनं

संजय दत्तचे वैवाहिक आयुष्यही राहिले वादात, मान्यता दत्त आधी इतक्या वेळा केले आहे लग्न

 

Web Title: Sanjay dutt returns mumbai for third cycle of chemotherapy for lung cancer treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.