संजय दत्तने म्हटले; मी दुसºयांदा आईला गमविले!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 04:03 PM2017-05-18T16:03:33+5:302017-05-18T21:33:33+5:30
‘वास्तव’ या चित्रपटात संजूबाबाच्या रिल लाइफ आईची भूमिका साकारणाºया रिमा लागू यांच्याशी संजूबाबाची रिअल लाइफमध्येही घनिष्ठ नाते होते. जेव्हा त्याला रिमा यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्याने ‘मी दुसºयांदा माझ्या आईला गमावून बसलो’ अशी प्रतिक्रिया दिली.
ज येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनाची बातमी आली अन् संपूर्ण बॉलिवूडमध्ये जणू काही शोककळा पसरली. अनेक चित्रपटांमध्ये आईची भूमिका अजरामर करणाºया रिमा यांची अचानक एक्झिट अनेकांना चटका लावून गेली. अभिनेता संजय दत्तला तर रिमा लागू यांचे निधन झाले यावर विश्वासच बसला नाही. ‘वास्तव’ या चित्रपटात संजूबाबाच्या रिल लाइफ आईची भूमिका साकारणाºया रिमा लागू यांच्याशी संजूबाबाची रिअल लाइफमध्येही घनिष्ठ नाते होते. जेव्हा त्याला रिमा यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा त्याने ‘मी दुसºयांदा माझ्या आईला गमावून बसलो’ अशी प्रतिक्रिया दिली.
पिंकविलाशी बोलताना संजय दत्तने म्हटले की, रिमाजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूपच दु:ख झाले. त्यांच्यासोबत माझ्या बºयाचशा आठवणी आहेत. त्यातही ‘वास्तव’मधील बरेचसे प्रसंग आजही स्मरणात आहेत. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. जेव्हा मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळत होती, तेव्हा त्यांच्याकडून बºयाचशा गोष्टी शिकण्यास मिळत असत. त्यांच्या निधनामुळे आता ती जागा कायमची रिकामी झाली आहे. रिमाजींच्या रूपात आपल्याकडे सर्वांत स्वच्छ आणि निर्मळ प्रतिमा होती. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच माझी प्रार्थना आहे. तसेच त्यांच्या परिवारासोबत माझी प्रार्थना आणि संवेदना आहे.
रिमा यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. रिमा यांनी ‘वास्तव’ या चित्रपटाबरोबरच ‘साजन’ या चित्रपटातही संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. रिमा या संजूबाबापेक्षा एक वर्षांनी मोठ्या होत्या. साजन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त ३२, तर रिमा ३३ वर्षांच्या होत्या. या चित्रपटात सलमान खान याचीही प्रमुख भूमिका होती. त्यावेळी सलमानचे वय २६ वर्ष होते.
दरम्यान, रिमा यांनी ‘वास्तव’मध्ये संजूबाबाच्या आईची अतिशय दमदार भूमिका साकारली होती. आपल्या मुलाला पोलिसांपासून वाचविताना कठोर काळीज करून त्या आपल्या मुलाला गोळी झाडतात, हा चित्रपटातील क्षण अंगावर शहारा आणणारा आहे. रिमा यांनी ‘वास्तव’मधील ही भूमिका अजरामर केली आहे.