Sanjay Dutt: संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांची दुबईत भेट, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:18 PM2022-03-17T17:18:30+5:302022-03-17T17:19:17+5:30
Sanjay Dutt Mett Pervez Musharraf :संजय दत्तचा दुबईमधला एक फोटो चांगलाच व्हायरल होतोय, ज्यात तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांना भेटताना दिसत आहे.
2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. तिथल्या स्टार्ससोबत काम करणेही बंद झाले आहे. दोन्ही देशांमधील हा तणाव आजही कायम आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्त(Sanjay Dutt) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ(Pervez Musharraf) यांच्यासोबत दिसला तर?
संजय दत्त-परवेझ मुशर्रफ भेटीवर उपस्थित झाले प्रश्न
संजय दत्तचा(Sanjay Dutt) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो परवेझ मुशर्रफ(Pervez Musharraf) यांना भेटताना दिसत आहे. दोघांची ही भेट दुबईत(Dubai) झाली. हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी संजय दत्त आणि मुशर्रफ यांची भेट जिममध्ये झाल्याचे म्हटले आहे. काहीजण दावा करताहेत की, संजय दत्त चुकून मुशर्रफला भेटला. फोटोत परवेझ मुशर्रफ व्हीलचेअरवर बसलेले दिसत आहेत, तर संजय दत्त कोणाशी तरी बोलताना दिसत आहे.
What the hell has a #Bollywood actor got to do with #MASTERMINDofKARGIL ...#SanjayDutt loves #DRUGS#DARU#GUNS and #dawoodibrahim
— Raman Malik🇮🇳 (@ramanmalik) March 17, 2022
Sanjay dutt with Mushraf in dubai.
Thats why I say that liberation of #Bollywood#LeLI#KHANdan is a must and #TheKashmirFiles is the start. pic.twitter.com/RF7IDC0rKq
हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. मुशर्रफ आणि संजय दत्त एकत्र येणे काहींना आवडलेले नाही. एका यूजरने लिहिले - 'हुकूमशहा जनरल मुशर्रफ संजय दत्तसोबत हँग आउट करत आहेत. काय चालू आहे?' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले - 'कारगिलच्या मास्टरमाइंडसोबत बॉलिवूड अभिनेता काय करत आहे. संजयला ड्रग्ज, दारू, बंदुका आणि दाऊद इब्राहिम आवडतात.'
#SanjayDutt met in #Dubai with Fmr #Pakistan Army General #PervezMusharaf who was responsible for #KargilWar
— Gautam Aggarwal 🇮🇳 (@gauagg) March 17, 2022
Wondering if the security agencies know about what the whole meeting was all about
Also #ArunachalPradesh Govt must remove him as state's brand ambassador if not done yet pic.twitter.com/YTU0SjXXXk