​संजय दत्त म्हणतो, ‘त्या’ पुस्तकातील सगळे किस्से खोटे! लेखकास पाठवले कायदेशीर नोटीस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 09:00 AM2018-03-21T09:00:23+5:302018-03-21T14:30:23+5:30

संजय दत्तची बायोग्राफी म्हणून मोठा गाजावाजा करत, बाजारात आणले गेलेले ‘संजय दत्त : द क्रेजी अनटोल्ड स्टोरी आॅफ बॉलिवूड ...

Sanjay Dutt says that all the stories in the book are false! Legal notices sent to writer !! | ​संजय दत्त म्हणतो, ‘त्या’ पुस्तकातील सगळे किस्से खोटे! लेखकास पाठवले कायदेशीर नोटीस!!

​संजय दत्त म्हणतो, ‘त्या’ पुस्तकातील सगळे किस्से खोटे! लेखकास पाठवले कायदेशीर नोटीस!!

googlenewsNext
जय दत्तची बायोग्राफी म्हणून मोठा गाजावाजा करत, बाजारात आणले गेलेले ‘संजय दत्त : द क्रेजी अनटोल्ड स्टोरी आॅफ बॉलिवूड बॅड ब्वॉय’ हे पुस्तक वादात सापडले आहे. होय, संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड करणाºया या बायोग्राफीचा लेखक आणि प्रकाशकास संजूबाबाने कायदेशीर नोटीस पाठवले आहे. 



ALSO READ : आई नरगिसचा ‘तो’ आवाज ऐकून सतत चार दिवस रडत होता संजय दत्त!

यासीर उस्मान यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजय दत्त : द क्रेजी अनटोल्ड स्टोरी आॅफ बॉलिवूड बॅड ब्वॉय’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक बाजारात येताच, यातील काही उतारे मीडियात प्रकाशित झाले होते. संजयच्या आई-वडिलांचे लग्न, संजयचा जन्म, बोर्डिंगमधील त्याचे शिक्षण, आईचा मृत्यू आणि संजयचे लव्ह अफेअर्स असे अनेक किस्से या बायोग्राफीत रंगवले गेले आहेत. केवळ इतकेच नाही तर संजयचा त्याच्या बहिणींसोबत बिघडलेले संबंध, त्याचे ड्रग्जचे व्यसन, व्यसनमुक्ती केंद्रातील त्याचे दिवस  याबद्दलही अनेक खुलासे यात करण्यात आले आहेत. या तथाकथित बायोग्राफीत संजय व माधुरी दीक्षित या दोघांच्या अफेअरचाही उल्लेख आहे. संजयची पहिली पत्नी रिचाला कॅन्सर होता. ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होती आणि याचवेळी तिला संजय व माधुरीच्या अफेअरबद्दल कळले होते. पतीच्या अफेअरच्या बातम्या ऐकून रिचा बैचेन झाली होती आणि ऐनकेनप्रकारे भारतात परतून आपले लग्न वाचवू इच्छित होती. १९९२ मध्ये रिचा भारतात परतली पण संजयने तिला टाळू लागला होता, असे यात नमूद आहे. मात्र या बायोग्राफीतील हे सगळे खुलासे, सगळे किस्से कपोलकल्पित असल्याचे संजयने म्हटले आहे.



ही माझी अधिकृत बायोग्राफ नाही. माझ्या अनेक जुन्या मुलाखतींच्या आधारे अनेक अतिरंजित कहाण्या यात प्रकाशित करण्यात आल्या आहेत. याबद्दल माझ्या वकीलाने संबंधित लेखकाला कायदेशीर नोटीस पाठवले आहे, असे संजयने टिष्ट्वटरवर स्पष्ट केले आहे. मला व माझ्या कुटुंबाला त्रास देतील, असे या कथित बायोग्राफीतील किस्से प्रकाशित केले जाणार नाहीत, अशी आशा करतो. मी लवकरच माझे अधिकृत आत्मचरित्र तुमच्यापर्यंत घेऊन येईल. यात केवळ सत्य तेच असेल, असेही संजयने स्पष्ट केले आहे.

Web Title: Sanjay Dutt says that all the stories in the book are false! Legal notices sent to writer !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.