शेर है तू शेर! संजय दत्तने कॅन्सरला दिली मात, आयुष्याची लढाई जिंकत फॅन्सना म्हणाला...
By अमित इंगोले | Published: October 21, 2020 04:11 PM2020-10-21T16:11:20+5:302020-10-21T16:14:02+5:30
संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे. संजयने या नोटमध्ये लिहिले आहे की, 'आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना माझं मन आनंदाने भरलं आहे. धन्यवाद!
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा परिवार आणि त्याचे फॅन्स त्याच्या आजारापणामुळे चिंतेत होते. संजय दत्तला फुप्फुसाचा कॅन्सर डायग्नोस झाला होता. पण आता असं वाटतं की संजय दत्त कॅन्सरमुक्त झाला आहे. ही खूसखबर त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सना दिली आहे.
संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट शेअर केली आहे. संजयने या नोटमध्ये लिहिले आहे की, 'आज तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करताना माझं मन आनंदाने भरलं आहे. धन्यवाद!
संजय दत्तने नोटमध्ये लिहिले की, 'गेले काही आठवडे मी आणि माझा परिवारासाठी फार कठिण होते. पण ते म्हणतात ना देव हा सर्वात मजबूत शिपायालाच सर्वात कठिण लढाई देतो. आणि आज माझ्या मुलांच्या वाढदिवसावर मी आनंदी आहे की, मी ही लढाई जिंकून परत आलो आहे. मी त्यांना आरोग्य आणि आमच्या परिवाराच्या चांगल्यासाठी हे सर्वात चांगलं गिफ्ट देऊ शकलो. हे सगळं तुमच्या विश्वासामुळे आणि सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. मी मनपासून सर्वांचा आभारी आहे. जे या कठिण काळात माझ्यासोबत उभे राहिले आणि माझी ताकद झालेत. मला इतकं प्रेम, दया आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वांचे आभार'.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यातच संजय दत्तने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संजय दत्तला कॅन्सरबाबत समजलं होतं. त्याने मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये कीमोथेरपी केली होती. त्यानंतर संजयने लगेच 'शमशेरा' आणि 'केजीएफ चॅप्टर २' चं शूटींग सुरू केलं होतं.