​आई नरगिसचा ‘तो’ आवाज ऐकून सतत चार दिवस रडत होता संजय दत्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 08:57 AM2018-03-19T08:57:11+5:302018-03-19T14:27:11+5:30

बॉलिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्त याच्या आयुष्यावरील चित्रपट पाहायला प्रेक्षक उत्सूक आहेत. संजूबाबाच्या आयुष्यातील अनेक चढ-ऊतार या चित्रपटात आपल्याला पाहायला ...

Sanjay Dutt was crying for four days for listening to the sound of 'Nargis'! | ​आई नरगिसचा ‘तो’ आवाज ऐकून सतत चार दिवस रडत होता संजय दत्त!

​आई नरगिसचा ‘तो’ आवाज ऐकून सतत चार दिवस रडत होता संजय दत्त!

googlenewsNext
लिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्त याच्या आयुष्यावरील चित्रपट पाहायला प्रेक्षक उत्सूक आहेत. संजूबाबाच्या आयुष्यातील अनेक चढ-ऊतार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्याआधीचं संजूबाबाच्या आयुष्यातील काही सीक्रेट्स जगापुढे आली आहेत. होय, यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘संजय दत्त : द के्रजी अनटोल्ड स्टोरी आॅफ बॅड ब्यॉय’ या चरित्रात संजयच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत.  संजयच्या लव्ह लाईफबद्दलची अनेक रहस्ये या पुस्तकात उघड केली गेली आहे. संजय दत्त त्याच्या आयुष्यात पूर्णपणे महिलांवर अवलंबून राहिला, असे या पुस्तकात म्हटले गेले आहे. संजयची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्याशी संबंधित अनेक रहस्येही लेखकाने पुस्तकात जाहिर केली आहेत. संजय व रिचाची पहिली भेट कुठे झाली, याबद्दल लेखकाने लिहिले आहे. त्यानुसार, एका चित्रपटाच्या मुहूर्ताला संजयने पहिल्यांदा रिचाला पाहिले. मल्टिकलर टॉप घातलेल्या रिचावर संजय असा काही भाळला की, त्याने अनेक खटाटोप करून तिचा नंबर शोधून काढला आणि मग थेट तिला आऊटींगसाठी विचारले. या पहिल्या भेटीत रिचा अन्य मुलींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, हे संजयला जाणवले. पुढे संजयने रिचाशी लग्न केले.
रिचाशिवाय संजय दत्तचे अनेक अभिनेत्रींशी अफेअर राहिले, याबद्दलही लेखकाने लिहिले आहे. रिचाचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर संजयचे नाव टीना मुनिमशी जोडले गेले. माधुरी दीक्षित, रेखा, रिया पिल्लई, लिजा रे या अभिनेत्रींसोबतही संजयचे नाव जोडले गेले. या पुस्तकात संजयने स्वत:चे अनुभवही आहेत. संजयला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरणा हवी होती. आधी तो आईवर अवलंबून होता नंतर गर्लफ्रेन्ड  आणि पुढे बहिणींवर, असेही यात म्हटले आहे. संजयची आई नरगिस यांच्या निधनाबद्दलही या पुस्तकात लिहिले गेले आहे. आई गेली, त्या दिवशी संजय अजिबात रडला नव्हता. पण आईच्या निधनानंतर तीन वर्षांनीसंजय अमेरिकेतील एका व्यसनमुक्ती केंद्रात होता. त्याच्या मदतीसाठी वडिल सुनील दत्त यांनी संजयला नरगिस यांचे अखेरच्या दिवसांतही काही रेकॉर्ड टेप पाठवले होते. या टेपमध्ये काय आहे, हे संजयला माहित नव्हते. ते सुरू झालेत आणि खोलीत अचानक नरगिस यांचे शब्द ऐकू आलेत. त्यादिवशी संजय लहान मुलासारखा रडला. चार दिवस त्याचे अश्रू थांबले नव्हते.

ALSO READ : संजय दत्तच्या एका फॅनने आपली संपत्ती केली संजयच्या नावावर, मृत्यूपत्रात वारस म्हणून लिहिले संजयचे नाव

Web Title: Sanjay Dutt was crying for four days for listening to the sound of 'Nargis'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.