तुरुंगात जाताना संजय दत्तला एका गोष्टीची वाटत होती भीती, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:26 IST2025-02-20T16:26:05+5:302025-02-20T16:26:22+5:30
तुरुंगात जात असताना संजय दत्तला एका गोष्टीची भीती वाटत होती. ती गोष्ट कोणती, हे जाणून घेऊया.

तुरुंगात जाताना संजय दत्तला एका गोष्टीची वाटत होती भीती, जाणून घ्या...
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे गाजलेले चित्रपट दिले आहेत. अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. पण, यासोबतच त्याने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. १९९२ च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचे नाव गोवलं गेलं होतं. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली, त्यामुळे संजय दत्तने ५ वर्षाचा तुरुंगवास भोगला आणि २०१६ मध्ये त्याची सुटका झाली. त्यापुर्वी २००९-२०१० च्या सुमारास तुरुंगात जात असताना संजय दत्तला एका गोष्टीची भीती वाटत होती. ती गोष्ट कोणती, हे जाणून घेऊया.
२००९-२०१० च्या सुमारास संजय तुरुंगात असताना, त्याची मान्यता दत्त गर्भवती होती. मान्यताला अशा परिस्थितीत एकटे सोडण्याच्या विचाराने तो घाबरला होता. तेव्हा जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री शीबा आकाशदीपची ( Sheeba Akashdeep) मदत संजय दत्तनं घेतली होती. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शीबा आकाशदीपने खुलासा करत सांगितलं की, "त्या कठीण काळात मी मान्यतासोबत होते. ती कधीही एकटी राहणार नाही याची काळजी घेतली. जेव्हा तो तुरुंगात जात होता, तेव्हा त्याने मला फोन केला आणि म्हणाला, 'मान्यता एकटी आहे, तू जाऊन तिची काळजी घे".
शीबा पुढे म्हणाली, "मी दररोज माझ्या घरून मान्यताकडे जायचे. ती तिच्यासोबत बसायचे आणि तिच्यासोबत वेळ घालवायचे. मी संपूर्ण ९ महिने मान्यतासोबत राहिले". बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा झाली. तथापि, या काळात तो जामिनावर तुरुंगात येत-जात राहिला. पण अखेर २०१६ मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली. मान्यताने २०१० मध्ये मुलगा शहरान आणि मुलगी इकरा यांना जन्म दिला होता. संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकर 'बागी ४' चित्रपटात झळकणार आहे. येत्या ५ सप्टेंबर २०२५ मध्ये बागी-४ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येईल.