Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:26 PM2022-07-28T18:26:05+5:302022-07-28T18:26:58+5:30

Shamshera, Sanjay Dutt : ‘शमशेरा’ रिलीज झाल्यानंतर रणबीर ट्रोल होतोय. अद्याप रणबीर यावर काहीही बोललेला नाही. पण हो संजूबाबा मात्र संतापला आहे...

Sanjay Dutt writes note on Ranbir Kapoor getting hate for Shamshera | Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

googlenewsNext

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ची ( Shamshera) रिलीजआधी प्रचंड चर्चा होती. जबरदस्त स्टारकास्ट, जबरदस्त प्रमोशन यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण पहिल्या दिवशी या चित्रपटाने 10.25 कोटींची कमाई करत, सर्वांची निराशा केली. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने उण्यापुºया 31 कोटींचा गल्ला जमवला. एक लार्जर दॅन लाईफ इमेजच्या सिनेमाची इतकी वाईट गत होईल, याची कल्पना कुणीही केली नव्हती. रणबीर कपूरने या चित्रपटाद्वारे चार वर्षानंतर कमबॅक केलं होतं. त्यामुळे सगळ्यांनाच तो पैसा वसूल चित्रपट देईल, असं वाटलं होतं. पण झालं उलटलं. रणबीरही चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकला नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतर रणबीर ट्रोल होतोय. अद्याप रणबीर यावर काहीही बोललेला नाही. पण हो संजूबाबा (Sanjay Dutt) मात्र संतापला आहे.

होय, ‘शमशेरा’मध्ये शुद्ध सिंगची भूमिका साकारणारा संजय दत्तने हेटर्ससाठी एक लांबलचक पोस्ट लिहित, आपल्या सिनेमाचा बचाव केला आहे. रणबीर आणि ‘शमशेरा’चा दिग्दर्शक करण मल्होत्रा या दोघांना सुद्धा त्याने पाठींबा दिला आहे.

संजय लिहितो,
चित्रपट बनवणं एक पॅशन आहे. एक कथा पडद्यावर आणण्याचं पॅशन, त्या कथेतील सर्व पात्रांना एकत्र आणण्याचं पॅशन. शमशेरा हा सिनेमा याच पॅशनचा भाग आहे. यासाठी आम्ही आमचं सर्व काही दिलं. रक्त, घाम, अश्रूंनी बनलेला हा सिनेमा आहे. हे एक स्वप्न होतं, जे आम्ही पडद्यावर साकारलं. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवले जातात आणि प्रत्येक चित्रपटाचे आपले खास प्रेक्षक मिळतात. कधी लवकर,कधी उशीरा... शमशेराबद्दल बरंच नकारात्मक बोललं जात आहे. काही लोकांनी तर या चित्रपटाचा इतका द्वेष चालवला आहे की, न पाहताच हा चित्रपट सुमार असल्याचं ते म्हणत आहेत. लोक आमच्या कठोर परिश्रमाचा आदर करत नाहीत, हे पाहून खंत वाटते. मी एक चित्रपट निर्माता आणि एक व्यक्ति या नात्याने करणचं (करण मल्होत्रा) कौतुक करतो. चार दशकाच्या माझ्या दीर्घ करिअरमध्ये मी ज्या सर्वोत्तम दिग्दर्शकांसोबत काम केलं, त्यापैकीच तो एक आहे. शमशेरा एक दिवस आपला ‘कबीला’ शोधेलच. पण तोपर्यंत मी या चित्रपटासोबत आहे.

या चित्रपटादरम्यान आम्ही तयार केलेल्या आठवणी, नाती, आम्ही भोगलेले कष्ट सगळं माझ्यासोबत आहे. मी चित्रपटाच्या संपूर्ण युनिटचे, कलाकारांचे आभार मानतो. ही सर्व माणसं चार वर्ष चित्रपटासोबत राहिलीत. अगदी महामारीच्या काळातही. रणबीर व माझ्यात या चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखं नातं निर्माण झालं आहे. तो एक सर्वोत्तम अभिनेता आहे. आजघडीच्या सर्व मेहनती व गुणी कलाकारांपैकी एक असलेल्या रणबीरबद्दल नकारात्मकता पसरवण्यासाठी लोक इतके उत्सुक आहेत, हे पाहून दु:ख होतं. अर्थात कला आणि त्याच्याप्रतीची आमची कटिबद्धता या नकारात्मकतेपेक्षा मोठी आहे. बाकी कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.., अशा आशयाची पोस्ट संजय दत्तने शेअर केली आहे.

Web Title: Sanjay Dutt writes note on Ranbir Kapoor getting hate for Shamshera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.