संजय दत्त बायोपिकच्या शुटिंगला सुरूवात ; दियाची झाली एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 06:42 PM2017-01-15T18:42:13+5:302017-01-15T18:42:13+5:30

बायोपिकच्या शूटिंगला सुरूवात झाली असल्याने अलीकडेच दियाने चित्रपटाच्या सेटवर एन्ट्री केली आहे. संपूर्ण चित्रपटाच्या टीमने एकत्र येऊन सेटवर केक कटिंग देखील केली.

Sanjay Dutt's biopic shooting begins; The entry was done! | संजय दत्त बायोपिकच्या शुटिंगला सुरूवात ; दियाची झाली एन्ट्री!

संजय दत्त बायोपिकच्या शुटिंगला सुरूवात ; दियाची झाली एन्ट्री!

googlenewsNext
िनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर बायोपिक काढण्यात यावा असे जेव्हा दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ठरवले तेव्हा काही कलाकारांचे चेहरे दिग्दर्शकाच्या नजरेतून त्यांना दिसले. त्यातील एक चेहरा म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झा. बायोपिकच्या शूटिंगला सुरूवात झाली असल्याने अलीकडेच दियाने चित्रपटाच्या सेटवर एन्ट्री केली आहे. संपूर्ण चित्रपटाच्या टीमने एकत्र येऊन सेटवर केक कटिंग देखील केली. 

संजय दत्त याचे आयुष्य वादग्रस्त राहिलेले आहे. त्याचे बॉलिवूडमधील करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यामुळे हा ‘मुन्नाभाई’ नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करून राहिलेला आहे. त्याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये रणबीर कपूर हा संजूबाबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणबीरला संजूबाबासारखी व्यक्तिरेखा करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आहे. विशेष ट्रेनिंग प्रोग्राममधूनही काही क्लिष्ट बाबींवर लक्ष केंद्रित करत आहे. रणबीर म्हणतो,‘संजय दत्त याच्यावर आधारित बायोपिकमध्ये माझी निवड करण्यात आली याचा मला आनंद वाटतोय. माझ्याकडे येणाºया प्रत्येक भूमिकेकडे मी गंभीरपणे पाहतो. अनेक वर्ष मी माझे चित्रपट हिट होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता ‘ऐ दिल हैं मुश्किल’ नंतर माझ्या चित्रपटांना यश मिळणे सुरू झाले आहे. ही बायोपिकही किती यश खेचून आणते, ते कळेलच.’ 

राजकुमार हिरानी यांनी ‘लगे रहो मुन्नाभाई’ साकारल्यानंतर संजय दत्त याच्या जीवनावर आधारित हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. याच चित्रपटात अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 








 

Web Title: Sanjay Dutt's biopic shooting begins; The entry was done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.