स्लिम फिगरसाठी संजय दत्तची लेक त्रिशालाने घटविले ३० किलो वजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 03:41 PM2018-01-05T15:41:31+5:302018-01-05T21:11:31+5:30
अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पापा संजय दत्तसोबतचा एक सेल्फी शेअर केला. ...
अ िनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पापा संजय दत्तसोबतचा एक सेल्फी शेअर केला. सेल्फी शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'plays like a kid, gives advice like a friend, protects like a body guard. I love you to the moon and back @duttsanjay लिहिले. त्रिशाला नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. वास्तविक त्रिशालाला हा ग्लॅमरस लूक मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. कारण एकेकाळी त्रिशाला खूपच ओव्हरवेट होती. परंतु तिने वजन कमी करून हा स्लिम लूक मिळवला. त्याचबरोबर तिने तिच्या लूक्सवरही अनेक प्रयोग केले.
त्रिशाला जेव्हा हायस्कूलमध्ये (२००३) शिक्षण घेत होती, तेव्हा तिचे वजन जवळपास ९० किलो होते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिने तिच्या फिगरवर विशेष लक्ष दिले. त्यासाठी तिने तब्बल ३० किलो वजन कमी केले. याचपद्धतीने गेल्या ३-४ वर्षांपासून ती सातत्याने वजन कमी करीत असून, आज तिचे वजन ५८ किलो इतके आहे. त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी आहे. सध्या ती फॅशन इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावत आहे. २०१४ मध्ये तिने तिची पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्सटेंशन लाइन सुरू केली. त्रिशालाने न्यू यॉर्क येथील जॉन जे कॉलेज आॅफ क्रिमिनल जस्टिस लॉमध्ये ग्रॅज्युएशनही पूर्ण केले.
संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला. ऋचाला ब्रेन ट्यूमर होता. ज्यामुळे १० डिसेंबर १९९६ मध्ये तिचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्रिशाला न्यू यॉर्क येथेल मावशी एनासोबत राहत आहे. संजय दत्तने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्रिशालाने चित्रपटांमध्ये काम करावे असे मला वाटत नाही. तिने दर्जेदार शिक्षण घेऊन अन्य क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करावा.