'बाहुबली'मधला कटप्पा साकारण्यास संजय दत्तने दिलेला नकार, ४४ वर्षांच्या कारकीर्दीत धुडकावल्या बऱ्याच भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:32 PM2024-04-04T15:32:30+5:302024-04-04T15:32:55+5:30
Sanjay Dutt : संजय दत्तने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण असे अनेक सिनेमे आहेत, जे संजू बाबाने नाकारले आणि नंतर त्यातील काही खूप हिट झाले आणि त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.
अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) बॉलिवूडच नाही तर साऊथमध्येही लोकप्रिय आहे. दिग्गज स्टार सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मुलाने चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. संजू बाबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या संजय दत्तने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण असे अनेक सिनेमे आहेत, जे संजू बाबाने नाकारले आणि नंतर त्यातील काही खूप हिट झाले आणि त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.
खुदा गवाह
अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या 'खुदा गवाह' या सुपरहिट चित्रपटासाठीही संजय दत्तला अप्रोच करण्यात आले होते. या चित्रपटात तो नागार्जुनची भूमिका साकारणार होता पण संजू बाबाला बिग बींसमोर सेकंड लीडची भूमिका करायची नव्हती आणि त्यामुळे त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
हीरो
जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी क्षेत्राद्री यांचा 'हीरो' हा चित्रपट १९८३ मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त दिग्दर्शक सुभाष घई यांची पहिली पसंती होती, पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर संजय दत्तनेही हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.
प्रेमग्रंथ
संजय दत्तने नाकारलेला तिसरा चित्रपट म्हणजे माधुरी दीक्षितचा 'प्रेमग्रंथ'. हा चित्रपट पहिल्यांदा संजय दत्तला ऑफर करण्यात आला होता पण तो त्यावेळी तुरुंगात असल्याने हा चित्रपट करू शकला नाही.
त्रिमूर्ती
संजय दत्तला पहिल्यांदा जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि शाहरुख खान स्टारर 'त्रिमूर्ती' चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला होता पण नंतर संजू बाबा कायदेशीर अडचणीत अडकला आणि अनिल कपूरला त्याची जागा घ्यावी लागली.
बाहुबली
फार कमी लोकांना माहित असेल की संजय दत्तने पॅन इंडियाचा ब्लॉकबस्टर प्रभास आणि राणा दग्गुबती यांचा 'बाहुबली' चित्रपटही नाकारला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, संजय दत्तला चित्रपटात कट्टप्पाची भूमिका करण्यासाठी निर्मात्यांनी प्रथम संपर्क साधला होता, परंतु काही कारणास्तव गोष्टी घडल्या नाहीत.
गँगस्टर
अनुराग बसूच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या कंगना राणौतच्या 'गँगस्टर' या डेब्यू चित्रपटात संजय दत्तला निर्मात्यांची पहिली पसंती होती पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला, त्यानंतर हा चित्रपट शायनी आहुजाकडे गेला.
ब्लफमास्टर
अभिषेक बच्चनच्या 'ब्लफमास्टर' चित्रपटातही निर्मात्यांची पहिली पसंती अभिषेक नव्हे तर संजय दत्त होता, मात्र संजू बाबाला चित्रपटाची कथा आवडली नाही आणि त्याने काम करण्यास स्पष्ट नकार दिला.
प्यार किया तो डरना क्या
निर्मात्यांना सलमान खानच्या 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटात संजय दत्तला कास्ट करायचे होते पण संजू बाबाने दुसरी मुख्य भूमिका करण्यास नकार दिला, त्यानंतर अरबाज खानला चित्रपटात कास्ट करण्यात आले.
रेस २
अनिल कपूर, सैफ अली खान आणि जॉन अब्राहम स्टारर 'रेस २' मध्ये संजय दत्तला पहिल्यांदा कास्ट केले जाणार होते. या चित्रपटात संजू बाबा जॉन अब्राहमची भूमिका साकारणार होता पण त्याला चित्रपटाची संकल्पना आवडली नाही आणि त्याने ते करण्यास नकार दिला.
हेरा फेरी
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा सर्वात मोठा हिट चित्रपट 'हेरा-फेरी'साठी संजय दत्त निर्मात्यांची पहिली पसंती होती, मात्र त्यावेळी न्यायालयीन प्रकरणामुळे संजय दत्तला चित्रपट सोडावा लागला आणि सुनील शेट्टीचा विचार करण्यात आला.