​संजय दत्तचा मुलगा शहरान करणार बॉलिवूड पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 03:28 PM2017-01-31T15:28:08+5:302017-01-31T20:58:08+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा मुलगा शहरान आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटात पदापर्ण करणार आहे. संजय दत्त प्रोेडक्शनच्या ‘हसमुख ...

Sanjay Dutt's son will make city Bollywood debut | ​संजय दत्तचा मुलगा शहरान करणार बॉलिवूड पदार्पण

​संजय दत्तचा मुलगा शहरान करणार बॉलिवूड पदार्पण

googlenewsNext
लिवूड अभिनेता संजय दत्तचा मुलगा शहरान आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटात पदापर्ण करणार आहे. संजय दत्त प्रोेडक्शनच्या ‘हसमुख पिघल गया’ या चित्रपटात राज क पूर यांच्या एका लोकप्रिय गाण्याच्या रिमिक्समध्ये शहरान दिसणार आहे. हा शहरान याचा डेब्यू नसला तरी तो एका लहानशा भूमिकेत दिसणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहारान आगामी ‘हसमुख पिघल गया’ या चित्रपटात ‘किसी की मुस्कुराहटो...’ या गाण्याचा रिमिक्स करण्यात आला आहे. यात तो छोटीशी भूमिका साकारताना दिसणर आहे. कॅमेºयाच्या समोर शहरानचे काम चांगले झाले असून हा त्याचा पहिला चित्रपट ठरणार आहे. गाण्याची शूटिंग तेव्हा सुरू केली होती जेव्हा तो तीन वर्षांचा होता. चित्रपटा हे गीत सुरुवातीला व अखेरीस दाखविण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त प्रोडक्शनने राज कपूर यांच्या या गाण्याचे अधिकार विकत घेतले आहेत. हे गाणे चित्रपटाच्या सुरुवातीला चित्रपटाचा नायक अरमानवर शूट करण्यात आले आहे. चित्रपटाच्या शेवटी सादर करण्यात येणाºया या गीतामध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहे. ‘हसमुख पिघल गया’ ही मुंबईच्या उन्हाळ्यातील एका दिवसाची कथा आहे. Read More : ​संजय दत्तने सोडली दारू : भूमीच्या शूटिंगसाठी घेतोय मेहनत



रोमांटिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटाच्या रिलीजची तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही. या चित्रपटाची शूटिंग आता जवळपास संपली असून चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला वेग आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सेजल शाह याने केले असून त्याची भाची नाजिया हुसैन व निर्माता ओ पी रल्हनचा नातू अरमान हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

ALSO READ 
संजूबाबाच्या बायोपिकमध्ये सोनम बनणार माधुरी?
‘भूमी’मधून संजय दत्त करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक

Web Title: Sanjay Dutt's son will make city Bollywood debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.