ही सुंदरी कोणी अभिनेत्री नाही तर आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 17:59 IST2021-03-18T17:58:23+5:302021-03-18T17:59:35+5:30
सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत या अभिनेत्याची पत्नी अतिशय हॉट दिसत आहे.

ही सुंदरी कोणी अभिनेत्री नाही तर आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी
संजय कपूरची पत्नी महिप कपूर ही दिसायला अतिशय सुंदर असून तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत ती अतिशय हॉट दिसत असून एखाद्या अभिनेत्रीइतकी सुंदर दिसत आहे.
महिपचे कुटुंब मूळचे पंजाबचे असले तरी ती अनेक वर्षं ऑस्ट्रेलियात राहिली आहे. महिपने १९९४ मध्ये आलेल्या इला अरुणच्या 'निगोडी कैसी जवानी है' या म्युझिक व्हिडिओत काम केले होते. मात्र त्यानंतर तिला अभिनय क्षेत्रात यश मिळाले नाही. २००२ मध्ये तिने संजय कपूरसोबत लग्न केले. महिप आता ज्वेलरी डिझाइनच्या बिझनेसमधून कोट्यवधी रुपये कमावते.
संजय आणि महिप यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी शनाया सध्या असिस्टंट डायरेक्टर म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. ती लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे म्हटले जाते.
संजय कपूरने आपल्या करिअरची सुरुवात १९९५ साली आलेल्या प्रेम या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याची अभिनेत्री होती तब्बू. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. यानंतर तो दिसला बॉलिवूड दिवा माधुरी दीक्षितसोबत राजामध्ये. हा चित्रपट संजय कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटानंतर रातो-रात तो स्टार बनला. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र या चित्रपटानंतर संजयला म्हणावे तसे यश मिळाले नाही. यानंतर त्याने तीन चित्रपटांची देखील निर्मिती केली.
संजय गेल्या काही वर्षांत कोणत्याही चित्रपटात झळकला नसला तरी त्याने काही वर्षांपूर्वी एका मालिकेत काम केले होते. संजय दिल संभल जा जरा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. पण या मालिकेला देखील प्रेक्षकांचे म्हणावे तसे प्रेम मिळाले नाही.