हे की ते? गोंधळलेल्या भन्साळींना भाईजान करणार मदत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 15:03 IST2019-03-12T15:00:33+5:302019-03-12T15:03:54+5:30
संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमान खान दिसणार, ही बातमी तर कन्फर्म झाली. पण या चित्रपटाचे नाव काय असणार, हे अद्याप कन्फर्म झालेले नाही.

हे की ते? गोंधळलेल्या भन्साळींना भाईजान करणार मदत!!
ठळक मुद्देभन्साळींच्या या चित्रपटात सलमान खानसोबत शाहरूख दिसणार, अशी चर्चा आहे. केवळ इतकेच नाही तर आलिया भट्ट हिलाही या चित्रपटासाठी अॅप्रोच करण्यात आल्याचे कळतेय.
संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमान खान दिसणार, ही बातमी तर कन्फर्म झाली. पण या चित्रपटाचे नाव काय असणार, हे अद्याप कन्फर्म झालेले नाही. पण आता एक ताजी माहिती खरी मानाल तर या चित्रपटासाठी भन्साळींनी दोन नावे निवडली आहेत.
डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळींनी या चित्रपटासाठी ‘दिल दे दिया इंशाअल्लाह’ आणि ‘प्यार हो गया इंशाअल्लाह’ अशा दोन नावांचे रजिस्ट्रेशन केले आहे. आता चित्रपट एक अन् नावे दोन, हे कसे काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर पुढची बातमी वाचा. सूत्रांचे मानाल तर नाव एकच असेल आणि त्याची निवड भाईजान करेल. होय, भाईजान या दोन पैकी एक नाव फायनल करेल आणि तेच चित्रपटाचे फायनल टायटल असेल.
खरे तर भन्साळी आपल्या या चित्रपटाला ‘इंशाअल्लाह’ असे नाव देऊ इच्छित होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी यासंदर्भात आपल्या टीमशी चर्चाही केली होती. पण कदाचित या चर्चेनंतर त्यांचे मन बदलले आणि ‘दिल दे दिया इंशाअल्लाह’ आणि ‘प्यार हो गया इंशाअल्लाह’ अशा दोन नावांचे रजिस्ट्रेशन झाले. आता भाईजान सलमानला कुठले नाव पसंत पडते, ते बघूच.
भन्साळींच्या या चित्रपटात सलमान खानसोबत शाहरूख दिसणार, अशी चर्चा आहे. केवळ इतकेच नाही तर आलिया भट्ट हिलाही या चित्रपटासाठी अॅप्रोच करण्यात आल्याचे कळतेय. अद्याप आलियाने या चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. पण भन्साळींनी यासाठी आलियाची जबरदस्त मनधरणी चालवली असल्याचे समजतेय. तूर्तास तरी भन्साळी या चित्रपटाची सगळेजण आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहूच.