WHAT? संजय लीला भन्साळी-दीपिका पादुकोणमध्ये बिनसलं! ‘गंगुबाई काठियावाडी’ ठरलं कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 01:14 PM2021-03-28T13:14:57+5:302021-03-28T13:16:11+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व दीपिका पादुकोण यांच्यातील बॉन्डिंग सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आता...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व दीपिका पादुकोण यांच्यातील बॉन्डिंग सगळ्यांनाच ठाऊक आहे. भन्साळींच्या रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा बॅक टू बॅक सिनेमात दीपिकाने काम केले. साहजिकच भन्साळी व दीपिका या जोडीला एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक असणार. पण आता अशी एक बातमी समोर येतेय, ज्यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते.
बॉलीवुड हंगामाच्या रिपोर्टनुसार, भन्साळी दीपिकावर नाराज आहेत. दीपिका व भन्साळींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदांचे कारण काय तर आलिया भटचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा.
होय, या सिनेमात भन्साळींनी दीपिकाला एक डान्स नंबर ऑफर केला होता. पण दीपिकाने म्हणे यास नकार दिला. यानंतर ‘हीरा मंडी’ या आगामी वेबसीरिजमध्येही भन्साळींनी दीपिकाला डान्स नंबर ऑफर केला. पण दीपिकाने ही ऑफरही नाकारली. दीपिकाच्या या नकारामुळे भन्साळी दुखावल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील हे मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि ते लवकर संपतील अशीही आशा आहे.
तूर्तास भन्साळी ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमात बिझी आहेत. हा सिनेमा हातावेगळा करताच ‘बैजु बावरा’ या प्रोजेक्टवर ते काम सुरु करणार आहेत. यात रणबीर कपूर, आलिया भट व दीपिका पादुकोण या तिघांना घेण्यास भन्साळी उत्सुक आहेत. अर्थात दीपिकासोबतचे कथित मतभेद निवळले तर.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका, शाहरुख खानसोबत ‘पठान’या चित्रपटात धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक सिनेमाही तिने हातावेगळा केला आहे. रणवीरच्या ‘83’ या सिनेमातही तिची छोटीशी भूमिका असणार आहे.