संतूरचे सूर मुके झाले; पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:34 PM2022-05-10T12:34:00+5:302022-05-10T13:29:43+5:30

प्रख्यात संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन झालंय. ते 84 वर्षांचे होते.  

Santoor player Pt. Shivkumar Sharma passed away | संतूरचे सूर मुके झाले; पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश

संतूरचे सूर मुके झाले; पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश

googlenewsNext

प्रख्यात संतूर वादक आणि संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन झालंय. ते 84 वर्षांचे होते.  गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते.वयाच्या 13 व्या वर्षांपासून पंडितजींनी संतूर शिकण्यास प्रारंभ केला. आज संतूर या वाद्याला देशविदेशात लोकप्रियता मिळवून देण्याचं सारं श्रेय त्यांना जातं. 

1967 मध्ये त्यांनी  हरिप्रसाद चौरसिया आणि संगीतकार ब्रजभूषण काबरा यांच्यासोबत केलेला  'कॉल ऑफ द व्हॅली' नावाचा अल्बम भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात मोठा हिट ठरला. 1955 मध्ये, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे पहिला सार्वजनिक कार्यक्रम दिला. वर्षभरानंतर त्यांनी 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत दिले. त्यांचा पहिला एकल अल्बम 1960 मध्ये रेकॉर्ड झाला.

2002 मध्ये त्यांनी 'जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्स: माय लाइफ इन म्युझिक' हे आत्मचरित्र प्रकाशित केले. ते भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलियातून आलेल्या विद्यार्थ्यांना फी न आकारता गुरूंच्या परंपरेनुसार संतूर शिकवत आणि अमेरिकेसारख्या जगाच्या विविध भागातून ते शिकायला शिष्य त्यांच्याकडे येत.


त्यांना मिळालेले पुरस्कार 
पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यात 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री तर 2011मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना 1985 मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.

Web Title: Santoor player Pt. Shivkumar Sharma passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :musicसंगीत