शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये झळकण्यासाठी सान्या मल्होत्रा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 16:43 IST2023-09-05T16:42:38+5:302023-09-05T16:43:16+5:30
Jawan Movie : जवानचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये झळकण्यासाठी सान्या मल्होत्रा सज्ज
जवान (Jawan Movie) या बहुप्रतिक्षित बॉलिवूड अॅक्शन थ्रिलर रिलीज होण्यासाठी अगदीच काही दिवस असताना त्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अरुण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, सान्या मल्होत्रा, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत दुहेरी भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या प्रीमियरला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, सान्या मल्होत्रा 'जवान' टी-शर्टमधील स्वत:चा फोटो शेअर करून या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवली आहे.
जवानमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सान्या मल्होत्राने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दलचा तिचा उत्साह शेअर केला आहे. तिने स्वत:चा 'जवान' टी-शर्ट घातलेला फोटो शेअर केला आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि ती प्रेक्षकांना मनोरंजनाने भरलेल्या अॅक्शन-पॅक प्रवासात घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे.
जवानचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर याची चर्चा आहे. चाहते चित्रपटाच्या कथानकाबद्दल आणि शाहरुख खानच्या वेधक दुहेरी भूमिकेबद्दल उत्कटतेने चर्चा करत आहेत. सान्या मल्होत्राच्या फोटोने जवानच्या बझमध्ये भर घातली आहे. जवान हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. सान्या मल्होत्राच्या अफलातून भूमिका असलेला जवान ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.