‘साहो’च्या दिग्दर्शकांनी म्हटले, ‘साहो’च्या सेटवर मनमानी करीत आहे ‘बाहुबली’ प्रभास!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 04:39 PM2017-11-03T16:39:10+5:302017-11-03T22:09:10+5:30
साउथ सुपरस्टार प्रभास खूपच शांत आणि सरळ स्वभावाचा आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल कुठलीही निगेटिव्ह बातमी सहसा समोर येत नाही. मात्र ...
स उथ सुपरस्टार प्रभास खूपच शांत आणि सरळ स्वभावाचा आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल कुठलीही निगेटिव्ह बातमी सहसा समोर येत नाही. मात्र आता एक अशा स्वरूपाची बातमी समोर येत असल्याने त्यावर विश्वास ठेवणे अवघड होत आहे. होय, ‘साहो’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीतने प्रभासबद्दल एक खळबजनक खुलासा केला आहे. सुजीतने एका मुलाखतीत म्हटले की, ‘प्रभास खूपच जिद्दी झाला आहे. तो ‘साहो’च्या सेटवर मनमानी करीत आहे. खरं तर सुजीतच्या या दाव्यावर विश्वास ठेवणे अवघड असले तरी, त्याने जे सांगितले ते खरं असल्याचे समजते.
वास्तविक सुजीतला हे म्हणायचे आहे की, वारंवार सांगूनही प्रभास एखादे काम करण्याची जिद्द धरतो. यामुळे त्याला नुकसान होण्याची शक्यता असते. मुलाखतीत सुजीतने म्हटले की, प्रभासने ‘साहो’मध्ये बरेचसे खतरनाक स्टंट स्वत: केले आहेत. खरं तर यासाठी त्याला मनाई करण्यात आली होती. परंतु प्रभासने ते स्टंट करण्याची जिद्द धरली होती. स्टंट करताना बºयाचदा प्रभासला छोटी-मोठी दुखापतही झाली. त्यामुळे सुजीतला भीती वाटत आहे की, एखादी मोठी अप्रिय घटना घडू नये. त्यामुळे तो प्रभासविषयी सध्या चिंतित आहे. वृत्तानुसार ‘साहो’मध्ये वीस मिनिटांचा एक लांबलचक असा अॅक्शन सीन आहे. सीनची शूटिंग सध्या हैदराबाद येथे सुरू आहे. या वीस मिनिटांच्या अॅक्शन सीनमधील बरेचसे सीन स्वत: प्रभासने केले आहेत.
‘बाहुबली’च्या वेळीदेखील प्रभासने बरेचसे खतरनाक अॅक्शन सीन स्वत: केले होते. एक सीन करताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापतही झाली होती. दरम्यान, या वीस मिनिटांच्या अॅक्शन सीनमध्ये केवळ प्रभासच नसून, श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश हेदेखील काही स्टंट करताना दिसणार आहेत. असे म्हटले जात आहे की ‘साहो’चे पहिले शेड्यूल लवकरच पूर्ण होणार असून, दुसºया शेड्यूलला सुरुवात केली जाणार आहे. दुसºया शेड्यूलची शूटिंग दुबई येथे केली जाणार आहे. निर्मात्यांनी निश्चित केले की, चित्रपटाचा दुसरा भाग विविध देशांमध्ये चित्रित केला जाणार आहे.