बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्रीला उतरायचंय राजकारणात, स्वतः केला याबाबत खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 17:46 IST2019-04-13T17:44:34+5:302019-04-13T17:46:07+5:30
सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावारण असून बॉलिवूडच्या या अभिनेत्रीलादेखील राजकारणात उतरायचे असल्याचे सांगितले आहे.

बॉलिवूडच्या 'ह्या' अभिनेत्रीला उतरायचंय राजकारणात, स्वतः केला याबाबत खुलासा
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगची मुलगी अभिनेत्री सारा आली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता. साराचे या चित्रपटातील काम व सुशांत आणि तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात रणवीर सिंगसोबत झळकली. तिच्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर साराच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली. तसेच साराचे कार्तिक आर्यनवर क्रश असल्यामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती राजकारणात उतरायला आवडेल, या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
सारा अली खानची काही दिवसांपूर्वी मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत साराने म्हणाली की, ‘एक यशस्वी अभिनेत्री झाल्यानंतर मला राजकारणात उतरायला आवडेल. पण अभिनयाला माझे पहिले प्राधान्य असेल. साराने कोलंबिया विद्यापीठातून इतिहास व राज्यशास्त्र विषयाची पदवी घेतली असल्याने तिला राजकारणात रुची आहे हे देखील साराने यावेळी सांगितले.
दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या लव आज कल २ चित्रपटाच्या चित्रीकरणात सारा बिझी आहे. या चित्रपटात सारा कार्तिक आर्यन सोबत दिसणार आहे.
हा चित्रपट लव आज काल या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे आणि या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीमध्ये सुरू आहे.
तसेच ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये देखील सारा दिसणार असल्याचे बोलले जात आहे.