आता एकत्र दिसणार नाहीत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 19:13 IST2019-10-11T19:12:42+5:302019-10-11T19:13:44+5:30
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने नुकतेच 'लव आज कल २' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.

आता एकत्र दिसणार नाहीत कार्तिक आर्यन आणि सारा अली खान, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन बऱ्याचदा एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी दोघांनी 'लव आज कल २' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. दोघे पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
'लव आज कल २' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असं वृत्त आलं की दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता या कपलला घेऊन मोठं वृत्त समोर आलं आहे.
आता सूत्रांकडून असं समजतं आहे की सारा व कार्तिक दोघे फोटोंमध्ये एकत्र दिसणार नाहीत. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनने फोटोग्राफर्संना विनंती केली की पब्लिक प्लेसवर त्या दोघांचे एकत्र फोटो काढू नका.
कार्तिकला सारा अली खानचा बॉयफ्रेंड म्हणून ओळखू नये, असं त्याला वाटतं. चाहते त्याला एक अभिनेता म्हणून ओळखावं असं त्याला वाटतं. सारा व कार्तिकनं ठरवलं की, कामाच्या माध्यमातून त्यांना ओळख बनवायची आहे.
सारा व कार्तिक यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत कार्तिक साराच्या मागे छत्री पकडून चालताना दिसत होता. सारा व कार्तिक हे दोघे अफेयरमध्ये असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. तरीदेखील त्या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कबूल केलेलं नाही.
‘लव आज कल 2’मध्ये या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.