एकाच पार्टीत सारा अली खान आणि सारा तेंडुलकरचा जलवा, दोघींपैकी अधिक श्रीमंत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:09 IST2025-02-17T15:09:10+5:302025-02-17T15:09:21+5:30

सारा अली खान आणि सारा तेंडुलकर कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Sara Ali Khan And Sara Tendulkar Were Present At The Same Party Hosted By Orhan Awatramani Aka Orry | एकाच पार्टीत सारा अली खान आणि सारा तेंडुलकरचा जलवा, दोघींपैकी अधिक श्रीमंत कोण?

एकाच पार्टीत सारा अली खान आणि सारा तेंडुलकरचा जलवा, दोघींपैकी अधिक श्रीमंत कोण?

Sara Ali Khan And Sara Tendulkar: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक अभिनेत्री सारा अली खान कायम चर्चेत असते. तिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. तर भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकरदेखील कायम चाहत्यांचे लक्ष वेधत असते. सारा तेंडुलकर ही अभिनेत्री नसली तरी ती कायम बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्ससोबत स्पॉट होते.  सारा तेंडुलकर आणि सारा अली खान या दोघींचं एकमेकींसोबत कोणतंच कनेक्शन नाही. पण, दोघींचंही नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही दोघींची तुलना करताना दिसून येतात.

सारा अली खान आणि सारा तेंडुलकर यांच्यात मैत्री नाही. दोघी इन्स्टग्रामवरदेखील एकमेंकीना फॉलो करत नाहीत. पण, या दोघीही अलिकडेच ओरहान उर्फ ​​ओरीच्या पार्टीत पाहायला मिळाल्या. ओरीच्या पार्टीत इतर स्टार किड्सही होते. सारा अली खान काळ्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिचा लूकही सर्वांना आवडला. तर सारा तेंडुलकर सोनेरी-चांदीच्या वर्क ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. 

दोघींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खानचा स्कायफोर्स नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुकही झालं रिपोर्टनुसार सारा अली खान हिची संपत्ती ४१ कोटी रुपये आहे. तर सारा तेंडुलकर ही १ कोटी रुपयांची मालकीण आहे. वयाच्या २८ व्या वर्षी ती स्वतःचा व्यवसाय देखील चालवते. रा तिचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या फाउंडेशनमध्ये काम करते. तिने लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे आणि ती अनेकदा सोशल मीडियावर ब्रँड्सची जाहिरात करताना पाहायला मिळते. 

Web Title: Sara Ali Khan And Sara Tendulkar Were Present At The Same Party Hosted By Orhan Awatramani Aka Orry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.