सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत होते रिलेशनशीपमध्ये, पण बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:53 AM2020-08-21T11:53:26+5:302020-08-21T11:53:48+5:30
सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या नात्याबद्दल त्याच्या मित्राने सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला दोन महिने उलटून गेले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, आता सुशांतचा मित्र सॅम्युएल होकीपने एक खुलासा केला आहे. त्याने सोशल मीडियावर सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत रिलेशनशीपमध्ये होते, असा दावा केला आहे.
सॅम्युएल होकीपने इन्स्टाग्रामवर लिहिले की, 'केदारनाथच्या प्रमोशन दरम्यान सुशांत आणि सारा प्रेमात पडल्याचे मला आठवते. त्या दोघांना वेगळे करणे कठीण होते. दोघांचे नाते अगदी नितळ आणि निरागस होते. सुशांत आणि सारा यांना एकमेकांबद्दल खूप आदर होता जो आजकाल नात्यात क्वचितच दिसतो.
त्याने पुढे म्हटले की 'सारा, सुशांतसोबत असताना त्याच्या आयुष्यातील कुटुंब, मित्र आणि कर्मचारी यांचा आदर करत होती. मात्र सोनचिरैयाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीनंतर सारा अली खानने सुशांत सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दल मला आश्चर्य वाटते. हे बॉलिवूड माफियांनी बनवलेल्या कोणत्याही प्रकारच्या दबावामुळे होतं का? हे अद्याप स्पष्ट नाही.
सॅम्युएलने केलेल्या खुलाशा नंतर सर्वच चकीत झाले आहेत. सुशांतच्या मृत्यूबद्दल सारा कधीच उघडपणे बोलले नाही. तिने केदारनाथ चित्रपटातून सुशांतबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला होता.