Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 11:52 IST2024-07-25T11:52:33+5:302024-07-25T11:52:54+5:30
सारा अली खानचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तिला फ्लाईटमध्ये प्रवास करताना विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलंय (sara ali khan)

Video: एअर हॉस्टेसने गडबडीत महागड्या ड्रेसवर सांडला ज्यूस, साराचा राग अनावर; पुढे काय घडलं?
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत असते. साराने अल्पावधीत मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. साराने विकी कौशल, कार्तिक आर्यन, सुशांत सिंग राजपूत अशा विविध सुपरस्टार्ससोबत काम केलंय. सारा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. फ्लाईटमध्ये प्रवास करताना सारा अली खानला एअर हॉस्टेसच्या चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागलाय.
एअर हॉस्टेसने सारावर सांडला
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओत पाहायला मिळतं की सारा अली खान गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन फ्लाईटमध्ये बसलेली असते. अचानक ती पायलटकडे रागाने बघते. पुढे सीटवरुन उठून ती निघून जाते. एअर हॉस्टेसने गडबडीत साराच्या महागड्या कपड्यांवर ज्यूस सांडला. त्यामुळे सारा रागाने लालबुंद झालेली पाहायला मिळतेय.
खरंच असा प्रकार घडला की ही फक्त जाहीरात?
साराचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झालाय. याशिवाय या व्हिडीओखाली अनेकांनी सारा कोणत्यातरी जाहीरातीचं शूटींग करतेय अशा कमेंटही केल्या आहेत. आता काय खरं काय खोटं? हे सारालाच ठाऊक. साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'मर्डर मुबारक' सिनेमात झळकली. सारा लवकरच अनुराग बासूच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' या सिनेमात झळकणार आहे.