तू हिंदू आहेस की मुस्लिम? सारा अली खानला युजर्सनी केला सवाल; ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 11:55 AM2019-09-04T11:55:13+5:302019-09-04T11:56:22+5:30

साराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि साराच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली.

sara ali khan attacked by trolls celebrating ganesh chaturthi |  तू हिंदू आहेस की मुस्लिम? सारा अली खानला युजर्सनी केला सवाल; ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

 तू हिंदू आहेस की मुस्लिम? सारा अली खानला युजर्सनी केला सवाल; ‘या’ फोटोमुळे झाली ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देनुकतेच साराने ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटाचे शूटींग संपवले. सध्या ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहे.

गणेशोत्सवामुळे देशभरउत्साहाचे वातावरण आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही या उत्साहात सामील आहेत. या यादीत अभिनेत्री सारा अली खान हिचेही नाव आहे. साराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारा बाप्पाच्या मूर्तीसमोर उभी आहे. पण सध्या साराच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. होय, या फोटोवरून साराला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
‘गणपती बाप्पा मोरया... गणेशजी तुमच्या सर्व समस्या दूर करून तुमच्या आयुष्यात आनंद, सकारात्मकता, यश आणि भरभराटीने आणतील,’ असे हा फोटो शेअर करताना साराने लिहिले. पण यानंतर लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

‘तू मुस्लिम आहेस, असे मला वाटले होते,’ असे हा फोटो पाहून एका युजरने खोचकपणे लिहिले. तर एकाने साराला मर्यादेत राहा, अशी तंबी दिली.

एका युजरने साराला तिच्या नावातून अली खान हटवण्याचा सल्ला देत, माझ्या ‘इस्लाम’ला बदनाम करू नकोस, असे म्हटले. तर अन्य एका युजरने ‘तू मुस्लिम आहेस की हिंदू?’ असा सवाल तिला केला. साराने अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  


साराचा हा फोटो अभिनेता कार्तिक आर्यनने काढल्याचे म्हटले जात आहे. सारा व कार्तिक सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांत दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसले. नुकतेच साराने ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटाचे शूटींग संपवले. सध्या ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये बिझी आहे. यात ती वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: sara ali khan attacked by trolls celebrating ganesh chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.