सारा अली खान ठरली 2018ची लोकप्रिय अभिनेत्री, या हिरोईनला टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 06:26 PM2018-12-31T18:26:10+5:302018-12-31T18:37:37+5:30
सध्या सारा अली खानच्या सिम्बा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला आहे, अशातच साराच्या आनंदात आणखीभर पडली आहे
सध्या सारा अली खानच्या सिम्बा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला आहे, अशातच साराच्या आनंदात आणखीभर पडली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या डेब्यूटांट चार्टवर सारा सर्वाधिक लोकप्रिय डेब्यूटांट ऑफ दि इयर बनली आहे. एकिकडे सारा अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे समोर येतेय. तर अभिनेत्यांमध्ये ईशान खट्टर जास्त लोकप्रिय ठरला.
करण जोहरच्या ‘ध़डक’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणा-या जान्हवी कपूरला मागे टाकत साराने पहिले स्थान पटकावले आहे. बॉलीवूडमध्ये 2018मध्ये पदार्पण करणा-यांच्या लिस्टमध्ये सारानंतर जान्हवीचाच दुसरा क्रमांक लागला आहे. 2018 मध्ये साराच्या केदारनाथ आणि सिम्बा हे साराचे दोन सिनेमा रिलीज झाले. तर ईशानचेही बियॉन्ड दि क्लाउड्स आणि 'धडक' हे दोन सिनेमा रिलीज झाले.
बॉलीवूड अभिनेत्रींच्या 2018च्या रँकिंगमध्ये डिजिटल न्यूज़मध्ये साराचा तिसरा क्रमांक लागतो. तर न्यूज़पेपर रँकिंगमध्ये सारा दुस-या स्थानावर आहे. व्हायरल न्यू रँकिंगमध्ये ती पाचव्या पदावर आहे. तर साराची प्रतिस्पर्धक मानली जाणारी जान्हवी डिजिटल न्यूजमध्ये नवव्या क्रमांकांवर आहे. न्यूजपेपर रँकिंगमध्ये दहाव्या आणि व्हायरल न्यूज रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "सारा आणि जान्हवी दोघींच्या पहिल्या सिनेमाने भरपूर लोकप्रियता मिळवली नव्हती. मात्र साराच्या बाबतीत तिच्या दुस-या सिनेमाने ही कसर भरून काढली. साराची दूसरी फिल्म सिम्बाच्या प्रमोशनने साराच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. सोशल प्लेटफॉर्म, वर्तमानपत्र आणि वायरल न्यूज़ रँकिंगमध्ये साराची लोकप्रियता सिनेमाच्या रिलीजच्या दरम्यान वाढलेली दिसून आलीय. "
अश्वनी कौल पुढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”