सारा अली खानने शाहरुखला म्हटले ‘अंकल’; मग झाले असे काही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 04:00 PM2019-03-31T16:00:00+5:302019-03-31T16:00:01+5:30
फिल्मफेअर पुरस्काराने जिंकल्याच्या आनंदात सारा इतकी काही भान विसरली की, ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात ती शाहरूख खानला चक्क ‘अंकल’ बोलून गेली. होय, चक्क ‘अंकल’.
सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. या पहिल्या-वहिल्या चित्रपटासाठी साराने ‘फिल्मफेअर’ पुरस्कार जिंकला. ‘केदारनाथ’साठी बेस्ट अॅक्ट्रेस डेब्यूच्या अर्थात सर्वोत्कृष्ट पर्दापणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले. पण हा पुरस्कार जिंकल्याच्या आनंदात सारा इतकी काही भान विसरली की, ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात ती शाहरूख खानला चक्क ‘अंकल’ बोलून गेली. होय, चक्क ‘अंकल’.
‘माझा पापा शाहरूख अंकलसोबत फिल्मफेअर होस्ट करायचे. ते पाहून मजा यायची,’ असे आपल्या भाषणात सारा म्हणाली. साराने शाहरूखला ‘अंकल’ म्हटले, खरे तर इथेच ही गोष्ट इथेच संपायला हवी होती. कारण शाहरुख यावर काहीही रिअॅक्ट झाला नाही. पण झाले उलटेच सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. शाहरुख बोलला नाही पण शाहरुखचे चाहते आणि साराचे फॅन यांच्यात मात्र वाक्युद्ध रंगले. साराने शाहरूखला ‘अंकल’ म्हणणे काही लोकांना जराही रूचले नाही. मग काय, ‘अंकल’ ऐवजी सारा ‘सर’ म्हणू शकली नसती का? असा प्रश्न अनेक युजरनी विचारला.
Enjoy this video from Filmfare awards red carpet which is being trolled by fans of ageing, has been king, just because a young debutante called the 55 YO man as uncle (he is older than her dad)https://t.co/lyZGsI2Ji9
— ਪੰਜਾਬ ਨਾਗਰਿਕ (@akdwaaz) March 29, 2019
अर्थात अनेकांना मात्र साराने शाहरूखला ‘अंकल’ संबोधले, यात काहीही गैर वाटले नाही. २३ वर्षांच्या एका मुलीने आपल्या वडीलांपेक्षा मोठ्या व्यक्तिला ‘अंकल’ म्हणून बोलवू नये, तर काय म्हणावे? शब्दांत अनेकांनी साराची पाठराखण केली.
Sara Ali Khan called SRK uncle at Filmfare and people are trolling her. What do you expect a 23 YO to call a 50 plus man who is in real life, older than her father? Stupid fans need to accept their hero has aged enough to be called uncle.
— ਪੰਜਾਬ ਨਾਗਰਿਕ (@akdwaaz) March 27, 2019
सौंदर्य, परखड बोल आणि कमालीची विनम्रता यामुळे सारा कायम चर्चेत असते. ‘केदारनाथ’ या चित्रपटानंतर सारा रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये झळकली. पाठोपाठ तिसरा सिनेमाही तिला मिळाला. लवकरच सारा इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करेल.