"खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 10:56 IST2025-03-27T10:55:10+5:302025-03-27T10:56:01+5:30

सारा अली खान म्हणाली, "त्या घटनेमुळे मला..."

sara ali khan first time reacts on saif ali khan attack says life is very precious | "खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य

"खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य

अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काही महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. मध्यरात्री घरात घुसलेल्या चोराने सैफवर चाकूहल्ला केला होता. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता. रातोरात करीना, इब्राहिम यांनी सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केलं. तसंच त्याच्या राहत्या इमारतीच्या सुरक्षाव्यवस्थेवरहीव प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सैफची लेक आणि अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) पहिल्यांदाच त्या घटनेवर भाष्य केलं आहे.

सारा अली खान नुकतंच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाली, "तेव्हा खूप वाईट घडू शकलं असतं. पण सगळं ठीक आहे यासाठी मी देवाचे आभार मानते. त्या घटनेमुळे सर्वांनाच एक शिकवण मिळाली. आपण आपल्या आयुष्याचा आदर केला पाहिजे. मेंटल हेल्थवर आपण नेहमी बोलतो पण मिळालेल्या आयुष्यासाठी आपण आभारही मानले पाहिजेत. जवळच्या माणसांवर जेव्हा अशी वेळ येते तेव्हाच आयुष्य किती मौल्यवान आहे हे यातून कळतं. छोट्या छोट्या गोष्टी, छोटा आनंदही मौल्यवान असतो."

ती पुढे म्हणाली, "मी माझ्या वडिलांवर २९ वर्षांपासून प्रेम करते. त्यामुळे या घटनेमुळे मला त्याची जाणीव झाली असं नाही.  पण आयुष्य एका क्षणात बदलू शकतं याची जाणीव झाली. म्हणूनच प्रत्येक क्षण आनंदात जगला पाहिजे."

काय घडलं होतं?

दोन महिन्यांपूर्वी सैफच्या घरात चोर घुसला होता. एसी डक्ट मधून त्यान थेट सैफच्या मुलांच्या खोलीतच एन्ट्री केली. खोलीतील बाथरुममधून तो बाहेर आला. त्याला पाहताच केअरटेकरने आरडाओरडा केला. तेव्हा सैफ तिथे आला आणि त्याला धक्काच बसला. तो चोर जेहच्या जवळ उभा होता. दोघांमध्ये हातापायी झाली आणि यातच सैफ जखमी झाला होता. त्या चोराला शोधण्यात पोलिसांना बरेच दिवस लागले आणि नंतर अटक झाली.

Web Title: sara ali khan first time reacts on saif ali khan attack says life is very precious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.