सारा अली खान करणार हृतिकच्या अपोझिट डेब्यू ; बाईकचे घेतेय प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 03:57 PM2017-01-04T15:57:02+5:302017-01-04T15:57:02+5:30
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान लवकरच एखाद्या मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये ...
ब लिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान लवकरच एखाद्या मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डब्यू करणार असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. साराचे नाव करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट आॅफ द इयर २’ व झोया अख्तरच्या ‘गली बॉईज’ या चित्रपटाशी जोडले जात आहे. सारा सध्या एका चित्रपटासाठी बाईक चालविणे शिकत असून, या चित्रपटात ती हृतिक रोशनच्या अपोझिट दिसणार असल्याचे सांगण्यात येते.
एका संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, करण मल्होत्रा दिग्दर्शित हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या रोमाँटिक कॉमेडी चित्रपटातून सारा डेब्यू करणार असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘पिंकविला’च्या बातमीनुसार, हृतिक रोशनचा काबिल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर करण मल्होत्राच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला फेब्रुवारी महिन्यापासून सुरूवात केली जाणार आहे. सध्या करण शूटिंग लोकेशन्स पाहण्यासाठी पंजाबात गेला आहे. हा चित्रपट त्या भागात अधिक शूट केला जाणार आहे. तो या महिन्याच्या शेवटी शेवटी परत येणार आहे. दोघेही सोबतच शूटिंग सुरू करतील. या शिवाय त्याच्या सोबत सारा देखील शूटिंग सुरू करणार आहे. सारा यासाठी तयारी करीत असून, ती बाईक चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहे. साराला आपल्या डेब्यू चित्रपटातून लक्ष वेधता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे.
साराच्या डेब्यूबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. करण जोहर, झोया अख्तर यांच्या चित्रपटातून तर कधी हृतिक रोशन किंवा आर्यन खान यांच्या अपोझिट दिसणार आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान सैफने साराच्या डेब्यूबद्दल आपले मत मांडताना तिच्या आईवर म्हणजे अमृृता सिंगवर पूर्ण विश्वास टाकला होता. करिना कपूर साराच्या डेब्यूसाठी मदत करीत आहे असेही सांगण्यात आले होते.