Sara Ali Khan : दीपिकानंतर सारा अली खानच्या रेड बिकिनीची चर्चा, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हॉट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:27 IST2022-12-22T18:25:44+5:302022-12-22T18:27:17+5:30
Sara Ali Khan : ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या बिकीनीमुळे आधीच वातावरण तापलं आहे. अशात आता सारा अली खानच्या रेड बिकिनीने ‘आग’ लावली आहे.

Sara Ali Khan : दीपिकानंतर सारा अली खानच्या रेड बिकिनीची चर्चा, सोशल मीडियावर व्हायरल होतोय हॉट व्हिडीओ
‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे आधीच वातावरण तापलं आहे. अशात आता सारा अली खानच्या (Sara Ali Khan) रेड बिकिनीने ‘आग’ लावली आहे. होय, सारा अलीचा रेड बिकिनीतील एक हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. साहजिकच दीपिकानंतर आता सारा अली खानच्या बिकिनीची चर्चा सुरू झाली आहे.
सारा अली खान सध्या आई अमृतासोबत युकेत विंटर व्हॅकेशन साजरं करतेय. या व्हॅकेशनचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचपैकी एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
साराच्या या हॉट व्हिडीओने डिसेंबरच्या थंडीतही इंटरनेटचा पारा वाढवला आहे.व्हिडीओत सारा रेड बिकिनीत स्वीमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसतेय. तिची प्रत्येक अदा खल्लास करणारी आहे. साराचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहे. चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचा जणू वर्षाव केला आहे.
सारानं केदारनाथ सिनेमातून तिच्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर सिंबा , लव आजकल 2 सारख्या दमदार सिनेमात तिनं काम केलं. त्यानंतर धनुषच्या अतरंगी रे सिनेमातही तिनं मुख्य भूमिका साकारली होती. त्यातील चका चक हे गाणं चांगलंच गाजलं. लवकरच सारा आदित्य धर दिग्दर्शित ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती विकी कौशलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या ती गॅसलाइट या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.