सारा अली खानला आवडते सावत्र आई करिना कपूरमधील ‘ही’ गोष्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 10:00 AM2018-11-13T10:00:39+5:302018-11-13T10:01:58+5:30
सावत्र आई करिना कपूरमधील कुठली एक गोष्ट तुला सर्वाधिक आवडते, असा प्रश्न सारा अली खानला करण्यात आला. या प्रश्नाला साराने अगदी प्रामाणिक उत्तर दिले.
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिचा डेब्यू सिनेमा ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालय. सारा शिवाय चित्रपटाचा हिरो सुशांत सिंग राजपूत आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सगळ्यांनीच धम्माल केली. सारा तर भरभरून बोलली. ‘केदारनाथ’ या डेब्यू सिनेमाबद्दलचं नाही तर सावत्र आई करिना कपूर हिच्याबद्दलच्या प्रश्नांनाही तिने मनमोकळी उत्तरे दिलीत.
सावत्र आई करिना कपूरमधील कुठली एक गोष्ट तुला सर्वाधिक आवडते, असा प्रश्न सारा अली खानला करण्यात आला. या प्रश्नाला साराने अगदी प्रामाणिक उत्तर दिले. माझ्या मते, करिना अतिशय प्रोफेशनल आहे. ज्याप्रमाणे ती काम करते, ते सगळे अद्भूत आहे. मला तिचा हा अंदाज आवडतो. तिच्यातील एक गुण आत्मसात करायचा झाल्यास मी तिच्यातील प्रोफेशनलिजम घेईल, असे सारा म्हणाली.
पापा सैफबद्दलही ती बोलली. चित्रपटात येण्यापूर्वी मी माझे शिक्षण पूर्ण करावे हा पापांचा हट्ट होता. माझ्या बॉलिवूडमधील करिअरला त्यांनी कधीच नकार दिला नाही. उलट मला यासाठी प्रोत्साहितचं केले. पण त्याआधी मी शिक्षण पूर्ण करावे, एवढेच त्यांना हवे होते, असेही तिने सांगितले.
‘केदारनाथ’ची स्क्रिप्ट का निवडलीस? या प्रश्नाला उत्तर देताना तिने सांगितले की, मी या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू होते. मला ही स्क्रिप्ट इतकी आवडली की, मला हा चित्रपट करायचाच असे मी ठरवून टाकले होते.
‘केदारनाथ’ या चित्रपटात एका हिंदू-मुस्लिम कपलची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. केदारनाथमधील महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट साकारण्यात आला आहे. येत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.