'केदारनाथ' बघून करिना झाली इंम्प्रेस तर साराची आई अमृता सिंग होती 'ही' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 10:50 IST2018-12-14T10:41:25+5:302018-12-14T10:50:16+5:30
साराचा अभिनयाचे कौतूक सगळेच करतायेत. एका मुलाखती दरम्यान साराने आई अमृता सिंगचे सिनेमा पहिल्यानंतर काय रिअॅक्शन होते याचा खुलासा केला आहे.

'केदारनाथ' बघून करिना झाली इंम्प्रेस तर साराची आई अमृता सिंग होती 'ही' प्रतिक्रिया
सारा अली खानचा पहिला सिनेमा केदारनाथची बॉक्स ऑफिसवर घौडदौड कायम आहे. सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांची पसंती मिळाली आहे. साराचा अभिनयाचे कौतूक सगळेच करतायेत. एका मुलाखती दरम्यान साराने आई अमृता सिंगचे सिनेमा पहिल्यानंतर काय रिअॅक्शन होते याचा खुलासा केला आहे.
सारा म्हणाली, आईने सिनेमाची कथा आधीच ऐकली होती मात्र असे असताना ही सिनेमात क्लाइमेक्स सीन सुरु झाल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि हीच गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठी आहे.
दुसरीकडे साराचा अभिनय पाहून थक्क झालेली करीना कपूर तिच्या परफॉर्मन्ससाठी पार्टीचे आयोजन करणार आहे. या पार्टीमध्ये सारा व सैफच्या जवळचे व्यक्ती सहभागी होणार आहेत.
केदारनाथचा सिनेमाचा बजेट 35 कोटींचा होता आणि मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सिनेमाने 39 कोटींचा गल्ला जमावला आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ साली केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आला आहे. तांत्रिक मदतीने या महाप्रलयाची अनेक विध्वंसक दृश्य चित्रपटात जिवंत करण्यात आली आहेत. ‘केदारनाथ’नंतर सारा अली खानचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ प्रदर्शनास सज्ज आहे. येत्या २७ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात सारा रणवीर सिंगसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे रिलीज झालेय. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.