केदारनाथच्या सेटवर सारा अली खान दाखवतेय नखरे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 11:58 AM2017-09-20T11:58:28+5:302017-09-20T17:28:28+5:30
सैफ अली खान आणि अमृता सिंग ची मुलगी सारा आली खान केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या अपोझिट ...
स फ अली खान आणि अमृता सिंग ची मुलगी सारा आली खान केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्या अपोझिट या चित्रपटात मुख्य भूमिकेत सुशांतसिंग राजपूत दिसणार आहे ह्या चित्रपटाचे शूटिंग उत्तराखंड मधील काही लोकेशन्स सुर झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खानने सेटवर आपलेच म्हणणे चालवायला सुरवात केली आहे, सूत्रांच्यानुसार सारा आपल्या लुक्सला घेऊन फारच परफेक्ट आहे आणि तिने ठरवलेल्या लुक्समध्येच तिला कॅमेरा समोर यायचे असते. त्यासाठी ती तयार होण्यासाठी भरपूर वेळ लावते आणि सर्वांना सेटवर वाट पाहायला लावते, भरपूर वेळ ती आपला लुक चेंज करत राहते इतकेच नाही तर ती आपल्या नवीन लुकचे फोटो काढते आणि कोणालातरी सेंड करते आणि त्यानंतर सल्ला। घेऊन लुक चेंज करण्याची मागणी करते. याबद्दल अभिषेकने तिला साफ सांगितले आहे की चित्रपटासाठी जो लुक तिला योग्य आहेच तोच राहील त्यात काही ही बदल होणार नाही. त्यामुळे साराच्या या नख्यांमुळे सेटवरच सगळयांच्या नाकी नऊ आले आहेत. स्टार किड्स असल्यामुळे सारा अलीच्या डेब्यूवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सारा नेहमीच आपल्या वेगवेगळ्या अंदाजात मीडियासमोर येते. साराला बऱ्याचे वेळा सार्वजनिक ठिकाणी ट्रेडिंशनल अंदाजातच पाहण्यात आले आहे.
ALSO READ : View Pics : सारा अली खान अन् सुशांत सिंग राजपूत निघाले ‘केदारनाथ’च्या शूटिंगला!
केदानथामध्ये मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार सारा एक श्रीमंत घरातील मुलगी दाखवण्यात येणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिट्टूच्या भूमिकेत दिसणार आहे. टूरिस्ट गाईडला हिंदीत पिट्टू म्हटले जाते. हा पिट्टू आजारी आणि कमजोर लोकांना आपल्या पाठीवर टाकून त्यांना बर्फाचे डोंगर चढवून नेतो. हा पिट्टू श्रीमंत घरातल्या मुलीच्या प्रेमात पडतो. पिट्टूची भूमिके साकारण्यासाठी सुशांत सिंग राजपूत गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतो आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरने केदारनाथचे पोस्टर शेअर केले आहे. अभिषेक कपूर जवळपास एक वर्ष चित्रपटाच्या कथेवर काम करत होता.